पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/229

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १८८ ) विश्वास । निद्रा मांडनियां आळस ॥ ३ ॥ निळा म्हणे जे जे गाती । ते ते परमपदा जाती ।। ४ ।। ॥ ७६८ }} जेथुनियां येणें चि नाहीं । फिरोनियां कांहीं संसारा ।। १ ।। तया नांव परमपद । लाभती मुग्ध हरिनामें ॥२॥ पहा नवलाच हा कैसा । वानर रिसां पदप्राप्ती ॥ ३ ॥ निळा म्हणे श्रीराम सैवे । नामा- नुभावें मर्कट ते ॥ ४ ॥ | ॥ ७३९ ॥ अम्हां सांपडलें वर्म । हरिभक्तीचे सुगम ॥ १ ॥ यादें आळवावें नाम । हृदयीं धरुनियां प्रेम ॥ २ ॥ वाजवुनी टाळी । सुखें नाचावें राउलीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे संतीं । दाविलें हैं कृपावंतीं ॥ ४ ॥ | ॥ ७० ॥ म्हणक कामारी । दास्य करी यांच्या द्वारीं ।। १ ।। ऐसा भक्तांसी भुलला । नाम गातां तुइला ॥ २ ॥ नेणे याविण अणीक । शेषशाई वैकुंठ लोक ॥ ३ ॥ निळा म्हणे निःसीम भावें । भजले विके त्यांच्या नांवें ॥ ४ ॥ । ।। ७७१ ॥ अखंड भूतदया मानसीं । वाचे नाम अहर्निशीं ॥ तया न विसंबे हृषिकेशी । मागे मागे हिंडतसे ।। १ ।। जिहीं परकारणी वेचिलें । शरीर यष्य आपुलें ॥ धन वित्त ही वंचिलें । तयां विठ्ठले सन्मानिने ॥ २॥ जिहीं गाइलें नित्य नम । अंतरीं धरुनियां प्रेम । तया वस्तिसी निज धाम । निर्मुनियां ठेविलें ॥ ३ ॥ जिहीं धरिला संतसंग । दुरविले त्रिविध जग । तया सवा पांडुरंग । निजानुभवें जोडला ॥ ४ ॥ निळा म्हणे सद्गुरु भक्ति । दास्य ब्राह्मणांचे अनुरक्ती ॥ तया लागी हा श्रीपति । करी सांगाती आपुला ॥ ५ ॥ ।। ५७२ ॥ जे जे होउनियां अनुरक्त । झाले विरक्त हरिनामें ।। १ ।। त्यांचे अंगीं विमावला । हृदयीं चि राहिली प्रगटोनी ।। २ । नेदी उर दुसरेपणें । त्याचेनि प्राणे जीवें जितु ॥ ३ ॥ निळा ह्मणे घालुनी मिठी । यातें कल्प कोटी न विसंबे ॥ ४ ॥ ॥ ७७३ । लाजोनियां समाधी सुख । डाके अधोमुख इरिमेटी ॥ १ ॥ म्हणोनियां रतले दास । करिती उल्हास नित्य नवा ॥ २ ॥ ऐकोनियां नामावली । धांवोनी कवळी हृदय सां ॥ ३ ॥ निळा ह्मणे जवळी टाके । नेदी पारिखें दिसों चि ॥ ४ ॥