पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/224

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


( १८३ ) ॥ ७३६ ।। आठवितां याचे पाय । गेलें निरसोनी संसारभय ॥ १ ॥ अवघा काळ अवधी वेळ । स्मरणें याचिया सुमंगळ ॥ २ ॥ सदैव आह्मी भूमंडळीं । पढों हरिच्या नामावली ॥ ३ ॥ निळा ह्मणे यावरी आतां । नेणों जन्ममरणचिता ॥ ४ ॥ ॥ ७३७ ॥ ऐमा जोडियला दातार । करुनी नामाचा उच्चार ॥ १ ॥ आम्ही भाग्यवंत जनीं । पाय याचे विश्वासोनी ॥ २ ॥ नेदीं जाऊं कोठे दुरी । पुरची अवधैं चि हा घरीं ॥ ३ ।। निळा म्हणे त्वरित आला । फळा अर्थ तो चितिला ॥ ४ ॥ | ॥ ७३८ ॥ ने वर्षों यावरी आतां कोठें । सांडुनी चरण है गोमटे॥ १ ॥ जोडलें तें भाग्ययोगें । येणे काळे संतसंगें ॥ २ ॥ दुभिन्नले वरुषोनी वरी । प्रेम अमृताच्या धारीं ॥ ३ ॥ निळा म्हणोनी सांटी । केली जिवें देउनी मिठी ॥ ४ ॥ | ॥ ७३९ ॥ धन्यरूप झाली काळ । करितां कथा गदारोळ ॥ १ ॥ आजि पोखल्या आयणी । प्रेम सुखाचिया जेवण ॥२॥ होउनी ठेला दिव्यरूप । पुण्य निरसोनियां पाप ॥ ३ ॥ निळा म्हणे निमग्नता । झाली मन बुद्धी चित्ता ।। ४ ।। ॥ ७४० ।। होतें पूर्वजित । उत्तम संग्रहीं संचित ॥ १ ॥ तें चि उत्ती- र्णत्वा लागी । झाले सन्मुख ये मसंग ॥ २ ॥ भोग मोक्ष फळे । निवार शांतिबळे ॥ ३ ॥ निळा म्हणे सहज चि आला । ओघ अमृताचा हा जिव्हाळा ॥४॥ ॥ ७४१ ।। ब्रह्मीभूत होते काया। श्रीहरि पाय अनुसरतां ॥ १ ॥ परि हा विश्वास नुमटे मनीं । जाती म्हणउनी निरया गांवा ॥ २॥ जिहीं केला हा सायास । पावले पदास ते संत ।। ३ ।। निळा म्हणे अनुभवसिद्ध । ऐसी प्रसिद्ध कलियुगीं ॥ ४ ॥ ॥ ७४२ ॥ धराल तरी धराले चित्तीं। संशयनिवृत्ती ,करुनियां ॥ १ ॥ या हो विठोबाच्या नामें । साधने दुर्गमें लाजविलीं ।। २ ॥ सहज चि उच्चार करितां वाचे । सायोज्याचे अधिकारी ॥ ३ ॥ अनन्य भावें शरणांगत ।