पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/204

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विलें याचिया नांवा ॥ धांवोनि त्यांचा करी कुडावा । आपुलिया गांगने त्यासी ॥ ४ ॥ न ह्मणे चि दिवस रात्री कांहीं । सदा भक्ताचिये वाहीं ॥ निळा ह्मण त्याच्या चि देहीं । प्रगटे नव्हे निराळा ॥ ५ ॥ | ॥ ६१२ ।। अवघा कळा याचे हातीं । न करी काय एक श्रीपती ।। विप पाजितां अमृत । केली तृप्ती प्रल्हादा १ ॥ चंद्रहास्याचा कैवारी। क्षिलें त्या महामारी ॥ राज्य देऊनियां मुरारी । वैष्णवांमाज श्रेष्ठ केला ॥ २॥ आर्जुनाची प्रतिज्ञा गहनु । देखानि दिवमा लोपिला भानु । जयद्रथासी यमसदनु । प्राप्त केली तात्काळीं ।। ३ ।। गर्मी रक्षिला पार- क्षिती । सुदर्शन चक्र घेउनी हानीं ॥ उदरीं प्रवेशानियां श्रीपति । छेदिली शक्ति अनिवार ।। ४ ।। द्रौपदीच्या वस्त्रहरणीं । उडी घालुनी तत्क्षणीं ॥ केली वस्त्राची पुरवणी । लाजवेल कौरचें ॥ ६ ॥ गजेंद्रे संकटीं धांचा केला । वैकुंठीं यातें तो जाणों आला । येउनी तांती मग सोडविला । विमान नेला वेसवुनी ।। ६ ।। निळा ह्मणे ऐसी किती । तारिली ताराल तुह्मी पड़ती है। जयां तुमच्या नामीं प्रीती । ते ते होती आप्त तुम्ही ॥ ७॥ | ॥ ६१३ ॥ कांहीं चि सदैव दुवळे । न म्हणे हा बाळे नारीनर ॥ १ ॥ जयापरी तैसी होय । बापमाय सकळांचा ।। २ ।। शरणांताचिया नांवें । पशु हि उद्धरावे पक्षिया ।। ३ ।। निळा ह्मणे जीव जीवा । वंद्य हा देवां मानवमीं ॥ ४ ॥ ॥ ६१४ ॥ परम विश्रांती पावली । अवधी येणे सुखी केली ॥ १ ॥ आवडी वेदिती पूजिती । दर्शना जे याच्या येती ॥ ३ ॥ नाम उच्चारिती वाचे । नित्य कोड करी त्यांचे ॥ ३ ॥ निळा ह्मणे भक्तांसाठीं । धरी रूपे अनंतकोटी ॥४॥ | ॥ ६५५ ॥ भक्तांलागी पुढारला । येउनी पुढे उभा ठेला ॥ १ ॥ सिण भाग ही न विचारी । युगानयुगीं विटेवरी ॥ २ ॥ सोहळा अथिकें अधिक । करी भक्ताचे कौतुक ॥ ३ ॥ निळा ह्मणे वहुमानें । संतां पूजी वांट दानें ।। ४ ।। ॥ ६१६ ॥ भक्तांचिया घरा आला । सुख विश्रांति पावला ॥ १ ॥ उपकार ते वेळोवेळां । आठवी घननीळ सांवळा ॥ २ ॥ नाहीं कळिकाळा