पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/205

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १६४ ) हे भ्याले । अग्नि विष बाटुनी प्याले ॥ ३ ॥ निळा ह्मणे आभारला । मणवी भक्तांचा किला ॥ ४ ॥ ॥ ६१७ ॥ न विसंवे यां घटिका पळ । साचिपास सर्वकाळ || १ ॥ उत्तीर्णत्वा लागी हरि । साची परिचर्या करी ॥ २ ॥ न ह्मणे दिवस रात्री कांहीं । संचरोनी वसे त्याच्या देहीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे भक्तां घरीं । गुणें नामें रूपें हरी ॥ ४ ॥ ॥ ६५८ ॥ भक्त देव देवतार्चन । भक्त माझे पूजा ध्यान ॥ १ ॥ भक्ताविण भजों कोणा । ह्मणे वैकुंठींचा राणा ॥ २ ॥ भक्त माझा विधी जप । भक्त चि योग याग तप ॥ ३ ॥ निळा ह्मणे भक्तावरी । ऐसी निष्टा सांगे हरी ।। ४ ।।। ॥६१२॥ भक्त पूजिती भगवंता । भगवंत पूजी आपुल्या भक्तां ॥ १॥ ऐसा प्रीतीचा कळवळा । परस्परे हा सोहळा ॥ २ ।। भक्त देवाते चि उमगी । देव हि धांवे तयालागीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे एकएक । वमोनि भिन्नत्वाचे वीक ॥ ४ ॥ | ॥ २० ॥ भक्ती देवानें पूजिलें । देवें भक्तां सन्मानिलें ॥ १ ॥ ऐसे भजती येरयेरा । जमे जळ आणि जळगारा ॥ २ ॥ भक्त देवाजवळी वैसे । देव भक्तां घरीं वसे ॥ ३ ॥ निळा ह्मणे देवा भक्तां । सर्वकाळी एकात्मता ॥ ४ ॥ | ॥ ६२१ ।। देवामाजी भक्त असे । भक्ता अंगी देव दिसे ॥ १ ॥ ऐशी परस्परे मिळणी । जेवि प्रभा आणि तरणी ।। २ ॥ भक्त देवातें चि भजती । देवें भक्ती ठेविली प्रीति ॥ ३ ॥ निळा ह्मणे एक वंकी । जैसी अलंकार कनकीं ॥ ४ ॥ ॥ ६२२ ॥ अमोद न सोडी कपुर । किंवा प्रभेते रविकर ॥ १ ॥ तैसे चि देव आणि भक्त । येरवेरीं विराजित ॥ २॥ जेवि साखरेते गोडी । चंदन सौरभ्यो न सोडी ॥ ३ ॥ निळा ह्मणे अवकाश नभ । दोन्ही एक चि ते स्वयंभ ॥ ४ ॥