पान:तीन तत्वज्ञानी.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

प्रचलित विषयांवर लेख लिहीत असे. त्याच्या लेखांची भाषा दुर्बोध नसे. त्याचे काही काही लेख तर फारच मनोरंजक व विनोदाने भरलेले आहेत.

 जरी कँटचे तत्वज्ञानविषयक ग्रंथ फार दुर्बोध असले तरी तो शिक्षक या नात्याने फार चांगला वक्ता असे. नवीन मुलांच्या मनांत विषय भरवून देण्याचे कसब त्याला चांगले साधलेले होते. तो वर्गात जणूं काय एखाद्या तत्वज्ञानविषयक विचारसरणीचा प्रयोग करून दाखवी. प्रत्यक्ष माहिती सांगण्यापेक्षां विद्यार्थ्यांना तो विचार करण्यास शिकवी, असे म्हणणे जास्त बरोबर होईल. तसेंच विषयाचे विवेचन करतांना तो दाखले, उदाहरणे, गोष्टी इत्यादि सांगे. यामुळे त्याचे व्याख्यान फार मनोरंजक होई. मागे सांगितलेच आहे की, तो निरनिराळ्या विषयांवर व्याख्यानमाला चालू करीत असे. काही विषयांवरील त्याची व्याख्याने फारच लोकप्रिय असत. भूगोलविषयक पदार्थविज्ञानशास्त्र हा विषय त्याचा हातखंडा असे व गांवांतील प्रौढ गृहस्थ, सैन्यांतील अधिकारी, व्यापारी वगैरे लोक सुद्धा कँटची ही व्याख्याने ऐकावयास येत असत. तसंच पदार्थविज्ञानशास्त्र, किंवा ज्याला अर्वाचीन काळी समाजशास्त्र म्हणतात, त्याविषयावरील कँटची व्याख्यानमालाही फार लोकप्रिय असे. कारण तो प्रत्येक विषयाची संपूर्ण माहिती मिळवून तिचे आपल्या मनाशी तादात्म्य करून घेई. यामुळे त्याचे ज्ञान अगदी सत्यमय असे, व म्हणून त्याचा ठसा दुसयाच्या मनावर तो बरोबर वठवून देई.

 इ. स. १७५५ मध्ये लिसबन शहरी फार मोठा धरणीकंप झाला. त्याबरोबर या विलक्षण सृष्टिचमत्काराची माहिती देण्याकरतां कँटने एक उत्तम लेख 'धरणीकंप' या विषयावर लिहिला व त्यांत या संबंधाची उपलब्ध माहिती व या चमत्काराची उपपत्ति यांचे सुरस विवरण केले. १७६० च्या सुमारास स्वीडनबार्ज नांवाचा मनुष्य प्रसिद्धीस आला. आपल्याला अतींद्रियज्ञान आहे व आपल्याला मेलेल्यांच्या आत्म्याच्या संभाषण करता येते, असे तो म्हणे. कॅटला या विषयासंबंधी माहित मिळविण्याची इच्छा झाल्यामुळे त्याने स्वीडनबार्जच्या ग्रंथावर सात

८८