पान:तीन तत्वज्ञानी.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

 गांवांतील लोकांना त्याची कीव येत असे, व त्या शहरांतील एका साध्या भोळ्या उपाध्यायाला त्याची कीव येऊन त्याने एक संभाषणात्मक लेख छापला व त्यांत गृहस्थाश्रम स्वीकारणे हे प्रत्येक माणसाचे कर्तब्य आहे, व गृहस्थाश्रम हा फार सुखदायी आश्रम आहे असेंहि प्रतिपादन करून कँटला लग्न करण्याचा आग्रह केला होता. हा लेख वाचून वृद्ध कॅटला उप ध्यायाच्या आग्रहाचे हंसू आले. कँटने छापण्याचा खर्च त्या उपाध्यायाला दिला व विनोदाची गोष्ट म्हणून तो ही हकीकत आपल्या स्नेही मंडळीला सांगत असे.

 परंतु आपल्या ब्रह्मचर्याबद्दल स्तोम माजविलेलें त्याला आवडत नसे. त्याचा बहतेक वेळ शिकणे, शिकविणे व लिहिणे यांत जात असे. यामुळे त्याला पुढे लग्नाची आवश्यकता भासली नाही. शिवाय, कँटसारख्या विद्वान् व बहुश्रुत तत्वज्ञान्याला योग्य अशी स्त्री मिळणेहि काठणच होते. परंतु यावरून कॅट हा एकलकोंडा होता, किंवा त्याला एकलकोंडा आयुष्यक्रम आवडत असे अशांतला प्रकार नाही. त्याला स्नेहा-सोबत्यांची फार हौस असे, व त्याला सुस्थिति आल्यावर व त्याने बिऱ्हाड केल्यावर तो रोज आपल्या पंक्तीला आपल्या मित्रमंडळीतील शेलक्या लोकांना जेवावयास बोलवीत असे. केव्हांकेव्हां वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांनाहि तो जेवावयास बोलवीत असे. कँटला संभाषणाची कला फार चांगली: आवगत असे, व त्याला संभाषणाची कलाहि फार उत्तम साधलेली असे. शिवाय त्याचे संभाषण मनोवेधक असून त्यांत विषयवैचित्र्यहि फार असे. पुष्कळ लोकांच्या संभाषणांत त्यांच्या नेहमीच्या व्यवसायाचे घोडें सारखं पुढे यावयाचे. हा दोष कॅटच्या संभाषणांत केव्हांहि नसे. तो तत्वज्ञानासंबंधी केव्हाही संभाषण करीत नसे; कारण, तो म्हणे, संभाषणाचा तो विषय नव्हे. कँट फारच बहुश्रुत होता; तो प्रत्येक माणसाजवळ त्याच्या आवडत्या विषयावर बोले; व त्याच्याकडून माहिती काढून घेई; आणि आपल्याला असलेली माहिती सहजगत्या

८४