पान:तीन तत्वज्ञानी.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

युनिव्हर्सिटीत त्याने एकंदर सात वर्षे अभ्यास केला. त्याच्या घरची गरीबी असल्यामुळे त्याचे मित्र त्याला थोडी फार पैशाची व इतर आवश्यक गोष्टीची मदत करीत असत आणि त्याच्या मोबदला कँट हा त्यांना शिकवीत असे. परंतु हे सर्व दिवस त्याला मोठ्या कष्टानेच काढावे लागले.

 १७४६ साली, म्हणजे कॅटच्या २२ व्या वर्षी त्याचा बाप वारला, आणि त्यामुळे कँटला आपले शिक्षण सोडून पोटापाण्याच्या उद्योगाला लागावे लागले. कँटची मोठी महत्त्वाकांक्षा म्हणजे कानिग्सबर्ज विश्वविद्यालयांतील प्रोफेसरची जागा मिळविण्याची होती. परंतु आतां त्याला आपले शिक्षण अर्धवट टाकून, एका सुखवस्तु कुटुंबांतील खासगी शिक्षकाचा धंदा पत्करावा लागला. या रीतीने त्याने नऊ वर्षे काढली, व त्याच्या आयुष्यांतील हा कालच फक्त त्याने कानिग्सबर्जच्या बाहेर घालविला. या काळांत तो तीनचार कुटुंबांत राहिला. १७५५ मध्ये त्याने एक तात्त्विक विषयावर स्वतंत्र ग्रंथ लिहून डॉक्टरची पदवी मिळविली, व नंतर त्याला कॉनिग्सबर्ग विश्वविद्यालयांत बिनपगारी शिक्षकाची जागा मिळाली. तेव्हांपासून मरेपर्यंत म्हणजे सुमारे सतत पन्नास वर्षे, कँटने प्रोफेसराचे काम केले. जर्मन विश्वविद्यालयामध्ये पगारी प्रोफेसराचा दर्जा, पदवी व योग्यता मोठी असे, आपापल्या विषयांत पारंगत अशा लोकांना या जागा मिळत. दुसरा वर्ग बिनपगारी शिक्षकांचा असे. यांना विश्वविद्यालयांतून फक्त शिकविण्याची परवानगी मिळे, परंतु पगार मिळत नसे. विद्यार्थ्यांकडून जी काय फी मिळेल, त्यावरच यांना रहावें लागे. बिनपगारी शिक्षक व प्रोफेसर या दोघांची एकाच विषयावर व्याख्याने होत, व विद्यार्थ्यांना पाहिजे त्या व्याख्यानाना जाण्याची मोकळीक असे, जर्मनीतील एकंदर शिक्षण उच्च दर्जाचे राहण्यास या पद्धतचिा फार उपयोग झालेला आहे. जर्मनीतील विश्वविद्यालयाची युरोपांतील इतर विश्वविद्यालयांच्या वर कमान असण्याचे मुख्य कारण ही पद्धति होय, यांत शंका नाही. कारण, या पद्धतीमुळे शिक्षकांच्या दोन्ही वर्गाना आपापल्या विषयाची उत्तम तयारी करावी लागे. बिनपगारी

८२