पान:तीन तत्वज्ञानी.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कँट.
(१)

जीवन-वृत्तांत.

 मथळ्यांतील नांव वाचतांच माझे वाचक म्हणतील " हे लेखक लागले आपल्या आवडत्या तत्वज्ञान्याच्या गोष्टी बोलायला ! कँट मोठा तत्त्वज्ञानी असेल, पण त्याचे काय आम्हांला ! मराठीतील आध्यात्मिक वाङ्मयाला कंटाळून तर आम्ही अर्वाचीन ललितवाङ्मय करमणुकीकरितां व विश्रांतीकरितां वाचायला घेतो. तो येथेहे आमच्या पाठीस अध्यात्मविद्या आहेच ! त्यांतल्या त्यांत आम्ही असेंहि ऐकिले आहे की, कँटचे तत्त्वज्ञान तर फार खोल, फार गूढ आणि अत्यंत दुर्बोध आहे. ज्यांची जन्मभाषा जर्मन, अशा लोकांना सुद्धा कँटचे ग्रंथ समजत नाहीत, ते समजण्यास त्यांना इंग्रजी व फ्रेव भाषेतील भाषांतरांची मदत घ्यावी लागते. तेव्हां असलें गूढ, दुर्बोध व कठीण तत्वज्ञान आम्हाला कशाला ?"

 यावर माझे असे म्हणणे आहे की, कॅट हे नांव ऐकल्याबरोबर माझ्या प्रिय वाचकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. गुलाब म्हटल्याबरोबर गुलाबाच्या झाडाच्या कांट्यांचीच अठवण कां करावी? गुलाबाच्या फुलाची आठवण केल्यास व त्या गुलाबाचा सुवास, त्याच्या पानांची सुकुमारता, त्याचा मोहक रंग, यांचा विचार मनांत आणल्यास मनाला आल्हादच होईल. तसेच या विषयासंबंधीहि होईल अशी मी वाचकांची खातरजमा करतो. कारण, मी या लेखांत कँटच्या तत्त्वज्ञानाचे फारस विवेचन करणार नाही; केले तरी कँटच्या तत्वज्ञानरूपी डोहांत मी वाच

८०