पान:तीन तत्वज्ञानी.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जॉर्ज बार्क्ले

सर्वज्ञ, सर्वगुणवान असा परमेश्वर आहे असे त्याने प्रतिपादन केले आहे.सर्व - सृष्टि या परमेश्वराच्या इच्छा व बुद्धि यांचा विकास होय. सृष्टीचे इंद्रियांना गोचर होणारे स्वरूप हे खरे स्वरूप नव्हे, तर इंद्रियांनी दिलेल्या संवेदनांच्या आंत मानवी बुद्धाला पटणारे असें बौद्धिक स्वरूप आहे व हे स्वरूपच खरें होय व हे स्वरूप म्हणजे परमेश्वराचे शाश्वत विचार होत. या ग्रंथांत बार्क्लेच्या मनावर प्लेटो या तत्ववेत्त्याच्या विचारांचा फार परिणाम झालेला आहे असे पदोपदी दृष्टोत्पत्तीस येते. सारांश बार्क्लेला आता जगाकडे दोन दृष्टीने पहावेसे वाटे, एक इंद्रियहष्टि व दुसरी बौद्धिक दृष्टि. व जगाला दोन स्वरूपे आहेत, असें तो आतां प्रतिपादन करूं लागला.

 बार्क्लेच्या तत्वज्ञानाचे इतके विवेचन पुरे आहे. यापेक्षा जास्त खोल पाण्यांत शिरण्यांत अर्थ नाही. बार्क्लेच्या तत्वविचारांत एकसारखा बदल होत गेलेला आहे असें वरील विवेचनावरून दिसून येईल. पूर्ववयांत व उमेदर्दीत बार्क्ले हा ज्ञानाच्या स्वरूपासंबंधाने संवेदनावादी ( sensationa. list ) होता व यामुळे तो इंग्रज तत्वज्ञानी लॉक याच्या मताचा अनवादक होता असे म्हटले तरी चालेल. या बार्क्लेच्या पूर्ववयांतील तात्विक विचारांच्या पुढची पायरी ह्यूम या तत्वज्ञान्याने स्वीकारून लॉक व बार्क्ले यांच्या तात्विक विचारांवरून संशयवाद असा निष्पन्न होतो हे दाखविलें म्हणन तत्वज्ञानाचे इतिहासकार लॉक, बार्क्ले व ह्यूम अशी तत्वज्ञान्यांची परंपरा लावतात. बार्क्लेच्या मध्ययुगीन तात्विक विचारांचे साम्य रीड या स्कॉटिश तत्वज्ञान्याच्या विचारांशी आहे असे दिसते व त्याच्या उत्तर वयांत तो प्लेटो या तत्वज्ञान्याच्या विचारांच्या नजीक येत चालला होता असे दिसते. सारांश, बार्क्ले हा आमरणांत तत्वज्ञानाचा विद्यार्थी होता व त्याच्या विचारांची सारखी परिणति होत होती व म्हणून बार्क्लेचे तत्वज्ञान म्हणजे यरोपच्या अर्वाचीन तत्वज्ञानाची लहान आवृत्तिच होय असे म्हटलेले आहे व त्यांत बराच तथ्यांश आहे असे वरील विवेचनावरून वाचकांच्या ध्यानात येईल.

७९