पान:तीन तत्वज्ञानी.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

अस्तित्वाचे अनुमान कोणत्या खुणांवरून करतो ? आपल्याला इच्छाशक्ति आहे, आपण काही गोष्टी स्वतः होऊन करूं शकतों; आपली कृत्ये सहेतुक केलेली असतात. अशाच तऱ्हेचे वर्तन दुसरे लोक करतांना आपण पाहतो. यावरून ते ज्ञानी व शक्तिमान आत्मे आहेत असें आपण अनुमान करतो. ते दुसरे आत्मे आपल्याला प्रत्यक्ष दिसत नाहीत,पण त्या आत्म्यांच्या अस्तित्वाच्या खुणा आपल्याला ओळखतां येतात. आतां याच तऱ्हेनें सृष्टीच्या मूळाशी असलेल्या परमात्म्याच्या अस्तित्त्वाचे आपल्याला अनुमान करतां ते. सृष्टीचा क्रमही इतर बुद्धिमान मनुष्याच्या वर्तनक्रमाप्रमाणे सहेतुक, बुद्धिपुरस्सर व युक्तीने व नियमित पणे चाललेला दिसतो.या खुणांवरून आपल्याला सृष्टी कत्यांच्या कर्तृत्वाबद्दल अनुमान करता येते. सारांश जितक्या खातरीपूर्वक व ज्या अर्थाने आपल्याला दुसऱ्यांच्या आत्म्याच्या अस्तित्वाबद्दल ज्ञान होते तितक्याच खातरीपूर्वक व त्याच अर्थाने आपल्याला परमात्म्याच्या अस्तित्वाचे ज्ञान होते व जर आपण दुसरे आत्मे प्रत्यक्ष पाहतों असें म्हटले तर आपण परमेश्वर पाहतो असें म्हणण्यास हरकत नाही, कारण दुसरे आत्मे व परमेश्वर हे दोन्ही अमूर्त आहेत व त्या दोघांचे ज्ञान आपल्याला सारख्या तऱ्हेने होते. असो.

 सारांश, बार्क्लेच्या या मध्यकालीन तत्वज्ञानांत त्याचा भर जड सृष्टीचा अभाव दाखविण्यावर नव्हता. तर त्या तत्वज्ञानाची भर परमेश्वराचे स्वरूप व त्याचे अस्तित्व हे शाबीत करण्याचा होता व तो बार्क्लेनें चांगल्या रीतीने पार पाडला.

 पुढे दहा वर्षे बार्क्लेमें तत्वज्ञानविषयक ग्रंथ लिहिला नाही. त्याचा शेवटला तत्वज्ञानविषयक ग्रंथ 'सांखळी' हा होय. हा बार्क्लेने आपल्या साठाव्या वर्षी लिहिला. मागे सांगितल्याप्रमाणे या ग्रंथांत वैद्यकविषयक व तत्वज्ञानविषयक विचारांचे विलक्षण मिश्रण झाले आहे. त्यांत डामराच्या सर्वरोगशमनक्षमत्वापासून प्रारंभ करून या विशेषाचे कारण शोधतां शोधतां बार्क्ले सृष्टीच्या मूळाकडे गेला आहे व हे मूळ म्हणजेच सर्वशक्तिमान,

७८