पान:तीन तत्वज्ञानी.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जॉर्ज बार्क्ले

हेच बार्लेच्या पूर्ववयांतील तत्वज्ञानाचे सार आहे. यांत बाक्लेंचा भर ज्ञान संवेदनात्मक आहे, व जडवाद हा विसंगत व बुद्धीला अग्राह्य आहे असे सिद्ध करण्याकडे आहे.

 हीच मते बार्क्लेन नंतरच्या आपल्या ग्रंथांत संभाषणरूपाने प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. पुढे बार्क्लेचे लक्ष अमेरिकेत विश्वविद्यालय स्थापण्याच्या योजनेकडे लागले व याच काळांत त्याच्या वाचनांत प्लेटोच्या ग्रंथाने प्रमुख स्थान पटकावले व प्लेटोच्या विचारांचा बार्क्लेवर पगडा बसला. याचा परिणाम असा झाला की, त्याच्या मध्यकालीन तात्त्विक विचारांत थोडासा फरक पडला. आतां बार्क्लेला ज्ञानाचे संवेदनात्मक पृथक्करण अपुरे भासू लागले. संवेदनाखेरीज ज्ञानाचे विचाररूपी एक अंग आहे असें बार्क्लेच्या ध्यानात येऊ लागले. तेव्हापासन जडवादा विरुद्ध प्रतिपादनावरील त्याच्या लेखांचा भर कमी झाला व या जगाच्या मूळाशी परमात्मा व त्याचे विचार आहेत अशा प्रकारचे विवेचन जास्त जोराने पुढे आले. तसेंच संवेदनाचे सूचकत्व अनुभवाने-संईने कळतें असें पूर्वी बार्क्ले प्रतिपादन करीत असे त्याचेऐवजी सूचकत्व हे परमात्म्याच्या इच्छेचे व विचारशक्तीचें फळ आहे असे तो म्हणू लागला. सारांश, त्याच्या मध्यकालीन तत्त्वज्ञानमननांत परमात्म्याचे अस्तित्व व त्याचे स्वरूप व त्याच्या शक्ति या गोष्टींचा विचार त्याच्या मनाप प्रामख्याने येऊ लागला. व म्हणून या काळच्या ग्रंथांत परमात्म्याच्या अस्तित्वाची प्रमाणे बाक्लेने जास्त जोराने पुढे मांडली. उदाहरणार्थ, या जगाच्या रचनेत किती चातुर्य व कुशलता भरली आहे. यावरून या जगाचा आदिकर्ता हा कसा सर्व शक्तिमान सर्वज्ञ आहे हे प्रमाण बार्क्लेने मोठया सुंदर रीतीने आपल्या ग्रंथांत ग्रंथित केले आहे.

 त्याचे दुसरें प्रमाण अशा तऱ्हेचे आहे, मनुष्याला स्वतःचा आत्मा इंद्रियांनी दिसत नाही तर त्याची प्रतीती स्वयंस्फूर्तीने होते, परंत मनुष्याला दुसऱ्या आत्म्याचे ज्ञान फक्त अनुमानाने होते. कारण आत्मा ही प्रत्यक्ष दृश्य वस्तु नाही. आता आपण आपल्या व्यतिरिक्त आत्म्याच्या