पान:तीन तत्वज्ञानी.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

कडून आलेल्या किरणांनी पाडलेली आकृति अधिक मोठी व अधिक स्पष्ट असते इतकेंच, पदार्थाचा दूरपणा किंवा नजीकपणा हा आपल्याला खरोखरी गतीने प्रत्यक्ष कळतो. ज्या वस्तूकडे जाण्याला आपल्याला जास्त चालावे लागते ती वस्तु दूर आहे असे आपण समजतो व ज्या वस्तूकडे जाण्याला थोडे चालावे लागते ती जवळ आहे असे आपण म्हणतों. वस्तु दूर असतांना तिची आपल्या डोळ्यावर पडणारी आकृति लहान व अंधुक अशी आपण पाहतों व जसजसे आपण वस्तूच्या जवळ जवळ जातो तसतशी ही आकृति मोठी व स्पष्ट होत आहे अस आपल्याला दिसून येते. तेव्हां आकृतीचा कमीआधक अंधुकपणा व लहानमोठेपणा या पदार्थाच्या कमीअधिक दुरपणाच्या अंतराच्या खुणा आपल्या अनुभवावरून आपण मनांत बनवितों व वस्तूची डोळ्यावर पडलला आकृति स्पष्ट व मोठी असल्यास वस्तु जवळ आहे असे न कळत आपण अनुमान करतो. खरोखरी डोळ्यांनी आपल्याला पदार्थाचे अंतर किंवा खाली दिसत नाही. हळुहळ अनुभवाने आपण बिनचूक अनुमान करू शकतो. ही गोष्ट एका दाखल्याने स्पष्ट करता येईल. एखादा मनुष्य जन्मतः आंधळा आहे असे समजा, त्याला वस्तूंचे ज्ञान स्पर्शन्द्रियान व हालण्याचालण्याने किंवा गतीनेच फक्त झालेले असते. म्हणजे त्याला वस्तूची लांबीरुंदीखोली वस्तूचा दुरपणा वगैरे सर्व गोष्टी स्पर्शाने व गतीने प्रत्यक्ष झालेल्या असतात, पण त्याला वस्तूच्या रंगाचे ज्ञान नसते. अशा आंधळ्या मनुष्याला डोळे आले व त्याने एका आकाराचा व एका गाचा चेंडू व त्याच आकाराचे व त्याच रंगाचे चेंडूचे चित्र एकदम व सारख्या अंतरावरून पाहिले तर त्याला चेंडू कोणचा व चित्र कोणते हे ओळखत येणार नाही. कारण डोळ्यावर पडणाऱ्या दोन्ही रंगांच्या आकृतामध्ये सूक्ष्म भेद असेल खरा; पण तो भेद त्या डोळस झालेल्या आंधळ्याला कळणार नाही. त्या दिसत्या अकृतीकडे चालत जाऊन त्या दोन्ही वस्तूंना - स्पर्श करून जेव्हां तो डोळस मनुष्य पाहील तेव्हांच त्याला चित्र व चेंडू यातला फरक कळेल व मग पुनः दुरून डोळ्याने पाहून त्याला चित्राच्या व

७२