पान:तीन तत्वज्ञानी.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

रोड बेटांतून परत आल्यावर एक वर्ष पर्यंत तो लंडनमध्ये राहिला, व या वर्षभर याचा सारखा लेखनव्यवसायच चालू होता.

 १७३४ मध्ये बार्क्ले पुनः आपल्या देशी आयर्लंडला परत आला. अमेरिकेतील योजनेच्या बाबतीत सरकारच्या धोरणामुळे त्याची निराशा झाली होती. त्याची अंशतः भरपाई करण्याकरतां व काही अंशी बार्क्लेची थोर योग्यता मनांत आणून सरकारने बार्क्लेला क्लायानीची मोठ्या मानाची व हुद्याची बिशपची जागा दिली व बार्क्ले क्लायानी येथे राहायला गेला. येथे तो एकंदर अठरा वर्षे राहिला. बार्क्ले जरी प्रोटेस्टंटपंथी होता, तरी त्याची मतें उदार होती, आणि त्याचा देशाभिमानही संकुचित नव्हता. यामुळे तो प्रॉटेस्टंट व कथालिक या दोन्ही पंथांच्या लोकांना समानतेने वागवी. डब्लिन युनिव्हर्सिटींत कथालिक लोकाना घ्यावे असे त्याचे मत होते.

 येथे आपले काम करीत असतां बार्क्लेचें लक्ष्य सामान्य लोकाच्या स्थितीकडे लागले व आयरिश लोकांची किती दैन्यावस्था आहे ह त्याच्या ध्यानांत येऊन मोठ्या लोकांचे लक्ष्य या गोष्टीकडे वेधाव म्हणून त्यान प्रश्नांच्या रूपाने आपले विचार प्रदर्शित केले. या प्रश्नांचे तीन भाग बार्क्लेने प्रसिद्ध केले. या तिन्ही भागांत सामाजिक व अर्थशास्त्रविषयक किती तरी तत्वे न कळत ग्रथित झाली आहेत. ह्यूम किंवा अर्थशास्त्राचा जनक अडम स्मिथ याच्यापूर्वी सुमारे ४० वर्षे हा ग्रंथ लिहिला गेला. त्या मानाने त्याची महती विशेषच आहे. ज्या ज्या विषयाकडे बार्क्ले आपले लक्ष घाली, त्या त्या विषयांत तो काही तरी नव्या कल्पना काढीत असे. साध्या व सुंदर भाषेत आपले विचार प्रदर्शित करण्याची विलक्षण हातोटी त्याला साधलेली होती.

 वर सांगितलेच आहे की, क्लॉयानीचा बिशप या नात्याने बार्क्लेने १८ वर्षे त्या ठिकाणी काढली. या इतक्या अवकाशांत तो एकदांच बाहेर गेला होता व तो डबलीन येथे पार्लमेंट चालू असतांना होय.

 बार्क्ले क्लायानी येथे कायमचा येऊन राहिल्यावर १७३९ मध्ये आय- .

६६