पान:तीन तत्वज्ञानी.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

व्हरचा वृत्तांत' या जगप्रसिद्ध ग्रंथाचा कर्ता स्विफ्ट हा बार्क्लेप्रमाणेच आयरिशमन असून याच शाळेत शिकलेला होता. या शाळेत बार्क्लेने चार वर्षे काढली. या प्रदेशामध्ये सृष्टिदेवीचे मनोहर रूप दृग्गोचर होत असल्यामुळे बार्क्लेला सृष्टिसौंदर्याची गोडी लागली, व त्याची अवलोकनशक्ति सूक्ष्म झाली. याचे प्रत्यंतर त्याच्या ग्रंथांत वारंवार दिसून येते. सन १७०० मध्ये बार्क्ले हा मॅट्रिक्युलेशन परीक्षा पास झाला, व पुढील शिक्षणाकरितां तो आयर्लंडची राजधानी जी डब्लिन तेथल्या युनिव्हर्सिटींतील ट्रिनिटी कॉलेजांत दाखल झाला. येथे त्याने विद्यार्थी व शिक्षक या नात्याने आपल्या आयुष्याची तेरा वर्षे काढली. कॉलेजांत त्याच्याबुद्धीचा झपाट्याने विकास होऊ लागला व त्याला आध्यात्मिक आणि मानसशास्त्रीय ज्ञानाची गोडी लागली. त्याने कॉलेजांत असतांना वेळोवेळी आपल्या वाचनावरून सुचलेल्या विचारांचे, तसेच त्यावरून सुचलेल्या प्रश्नांचे व स्वयंस्फूर्तीने मनांत आलेल्या कल्पनांचे टिपण करून ठेवलेले आहे. ही बार्क्लेची टिपणवही त्याच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी छापली गेली. या टिपणवहीवरून त्याचे आध्यात्मिक विचार कसकसे बनत गेले, व शेवटी जें तत्त्वज्ञान त्याने जगाला शिकविले त्याचा उगम त्याच्या मनांत कशा तऱ्हेने झाला, हे फार चांगल्या तऱ्हेनें दिसून येते. कॉलेजांतील बार्क्लेच्या आयुष्यक्रमावरून त्याच्या भावी मोठेपणाची चिन्हें दिसून येतात. त्याच्या वेळच्या विद्यार्थ्यांना ते एक विलक्षण कोडेच वाटे. त्याच्यापासून दूर दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना तो एक अजागळ विद्यार्थी वाटे, व त्याप्रमाणे त्याची ते थट्टाहि करीत; पण बार्क्लेचा निकट संबंध असलेल्या विद्यार्थ्यांना मात्र त्याची बुद्धिमता, त्याची ज्ञानतृष्णा व त्याची उद्यमप्रियता पाहून बाक्लैंचे कौतुक वाटत असे. प्रत्यक्ष सत्यज्ञान मिळविण्याकरितां तो आपला जीवहि धोक्यांत घालण्याला कसा तयार असे, याबद्दलची एक मौजेची गोष्ट बार्क्लेच्या चरित्रकारांनी लिहून ठेविली आहे, ती येथे सांगण्यासारखी आहे.

 बार्क्ले व कॅटिरिनी (हा प्रसिद्ध इंग्लिश ग्रंथकार गोल्डस्मिथ याचा

५८