पान:तीन तत्वज्ञानी.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
जॉर्ज बार्क्ले.
अल्प चरित्र.


 कोणात्याही देशाकडे दृष्टि फेका. तुम्हाला सर्वत्र सरस्वतिमंदिर मुक्तद्वार दिसेल. तेथे क्याने लहान मोठा हा भेद मानला जात नाही, तेथें स्त्री-पुरुष या भेदास महत्त्व नाही, तेथे गरीबी-श्रीमंती इकडे लक्ष्य दिले जात नाही, तेथें हीनकुल किंवा उच्च कुल याची आडकाठी येत नाही, तेथे वंशपरंपरा किंवा पूर्वसंस्कार या गोष्टी पहाव्या लागत नाहीत, तेथें सामाजिक दर्जा किंवा धंदा याचाही अडथळा येत नाही. सारांश, सरस्वतीचे दारी कोणालाहि मज्जाव नाही, सरस्वतीचा वरदहस्त कोणावर पडेल, हे काही एक सांगतां येत नाही; परंतु एकदां का सरस्वतीचा वरद हस्त एखाद्या माणसावर पडला म्हणजे. तो तत्काळ सरस्वतिभक्त होतो व याला सरस्वतिमंदिरांत अग्रपूजेचा मान मिळतो.

 जॉर्ज बार्क्ले हा ब्रिटिश बेटांत एक मोठा सरस्वतिभक्त व तत्त्ववेत्ता होऊन गेला. त्याचा जन्म सन १६८५ मध्ये अत्यंत हीन व गरीब कुलांत झाला. बार्क्लेच्या आईबापांमध्ये कोणत्याही प्रकारचे विशेष गुण नव्हते. ती आपली साधीभोळी सामान्य माणसें होती. त्यांना सरस्वतीचा पूर्वसंस्कार कांहीं एक नव्हता. तेव्हां बार्क्लेमध्ये सरस्वतिभक्ति पूर्वसंस्काराने आली असें मुळीच म्हणता येत नाही. बार्क्ले-घराण्यांत जॉर्ज हा अकस्मात् एकाएकी उदय पावणाऱ्या धूमकेतूप्रमाणे होता, असे म्हणणे प्राप्त आहे.

 बार्क्ले हा १६९६ साली किलकेनीच्या शाळेत जाऊ लागला. 'गली