पान:तीन तत्वज्ञानी.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साक्रेटिस.

मुंळे ग्रंथाचा प्रसार ताबडतोब होण्यास कांहीं एक साधन नसे. परंतु, हल्ली हिंदुस्तानांत युरोपांतून छापण्याची कला आली आहे, व तिच्यायोगाने पुस्तके स्वस्त झाली आहेत. शिक्षणप्रसारामुळे वाचनाची गोडी लागली आहे, व यामुळे यूरोपांतल्याप्रमाणे वर्तमानपत्रांचा व मासिकांचा एक स्वतंत्र धंदा झाला आहे; तसेंच मनोरंजक व इतर पुस्तकें लिहून त्यांवर उपजीविका करण्याचा एक नवीन धंदा उत्पन्न झाला आहे; परंतु येथेंसुद्धां कर्तव्यबुद्धीपेक्षा दुसऱ्या मनोविकारांचे प्राबल्य दिसत आहे. पूर्वी लोकप्रीति हा प्रकार लोकांना ठाककच नव्हता. प्रत्येक माणसांत शांतपणे व गाजावाजा न करितां काम करण्याची बुद्धि जाऊन त्या ठिकाणी लोकप्रीतीचे वारे उत्पन्न झाले आहे. खरोखर लोकप्रीतीची आवड, म्हणजे एखाद्या मादक पदार्थाप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे माझ्या प्रिय ग्रीस देशांत डेमेगान नांवाचा लोकप्रीति संपादन करून आपला स्वार्थ साधणारा वर्ग उत्पन्न झाला, त्याप्रमाणे येथल्या सुशिक्षितांतहि प्रकार झाला आहे. कित्येक चांगले बुद्धिवान् व प्रतिभासंपन्न लेखक या लोकप्रीतीच्या पिशाचाने पछाडलेले मला दिसत आहेत. यांना सत्यासत्याची पर्वा नाही, चांगल्यावाईटाची चाड नाही, पापपुण्याची भीति नाही, सदसद्विवेकबुद्धीची मुरवत नाही, खऱ्या लोकहिताची फिकीर नाही, न्यायान्यायाची निवड नाही; सारांश, ज्या प्रवृत्तींच्या योगाने मनुष्याच्या आत्म्याची खरी उन्नति होते, त्यांकडे त्यांचे लक्ष नाही. 'येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत्' हे त्यांच्या वागणुकीचे तत्त्व. आपण प्रसिद्धीला येऊन आपला योगक्षेम चांगला चालला म्हणजे झाले, इतकेंच अशा लोकांचे पाहणे. या देशांतील सुशिक्षितांमधील बरेच लोक-या लोकांचा भरणा वर्तमानपत्रकर्ते, लेखक, व्याख्याते यांमध्येच जास्त आहे-या बौद्धिक व्यसनाच्या नादी लागले आहेत, ही मोठी शोचनीय गोष्ट आहे.

 "आतां सुशिक्षितांमधली शेवटली जात, म्हणजे शिक्षकवर्गाची होय. या वर्गाचे काम सर्व बहुजन समाजामध्ये ज्ञानप्रसार करण्याचे आहे, हे उघड आहे. बहुजनसमाजाच्या पुढारीपणाचा मान एकंदर सुशिक्षित

५५