पान:तीन तत्वज्ञानी.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

णारेच फार. अशा बोलण्याने हे लोक आपण मोठे जनपदहित करणारे आहोत, असा आव घालतात. पण ही निवळ लबाडी असते. हेच लोक सरकारी अधिकाऱ्यांजवळ गेले, म्हणजे सरकारचे गोडवे गाऊं लागतात. सारांश, वरून स्वतंत्रपणाचा व परोपकाराचा बहाणा करून आंतून अशा प्रकारचे लोक स्वार्थाकरतां हपापलेले असतात.

 "कांहीं सरकारी नोकर अंतरंगी व बहिरंगी स्तुतिपाठकच असतात. यांना सर्व वेळी सरकारची स्तुतिस्तोत्रं गाण्यांतच आनंद वाटतो व सरकारी नोकर या नात्याने आपण सरकारचे अगदी गुलाम आहोत, असे वाटते. सरकारचे हित करणे-मग त्यांत लोकांचे कितीहि नुकसान होईना त्याची ते पर्वा करीत नाहीत-हेच आपले इतिकर्तव्य समजतात. आपला स्वाभिमान न सोडतां, आपल्या देशप्रीतीला रजा न देतां, पण ज्या सरकारचे आपण अन्न खातों, त्यांच्याबद्दलहि योग्य अभिमान मनांत बाळगून सरकारी नोकरी करणारे किती विरळा दिसतात! हीच नोकराची खरी कर्तव्यबुद्धि ! या योगाने लोक व सरकार या दोघांचे हित होऊन अशा नोकराची स्वतःची दानतही उच्च दर्जाची राहते. परंतु जो हांजीहांजीपणा हेच आपले कर्तव्यकर्म समजतो, त्याची दानत अगदी खालच्या दर्जाची बनत जाते; त्याचा स्वाभिमान लयाला जातोः देशाभिमानापेक्षा देशद्रोह बळावतो; व असा मनुष्य सरकारचे व लोकांचंही काम बरोबर करीत नाही. पण सरकारला वरवर शिव्या देणारे पण त्यांची नोकरी करणारे तर दानतीने जास्तच वाईट; यांच्यामध्ये दुटप्पीपणा फार येतो; यांच्यामध्ये गर्व व हांजीहांजीपणा असे परस्परविरोधी गुण येऊ लागतात व असे लोक पहिल्यापेक्षाही भयंकर होतात. यांची दानत अगदीच नीच कोटीमधली बनते. पण हल्ली हिंदुस्थानांत अशांचा भरणा काय कमी आहे ? हा परिणाम अर्धवट ज्ञानाचा व कर्तव्यबुद्धीच्या अभावाचाच होय.

 " या वकिलांच्या जातीचे आतां निरक्षिण करूं या, खरोखर ही जात ब्रिटिश कायद्यामुळेच उत्पन्न झाली आहे. जुन्या काळी पंचांनी न्याय करण्याची पद्धति असे. तेथें साधारण विचारपूस करून खरे पाहून पंचांनी

५०