पान:तीन तत्वज्ञानी.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साक्रेटिस.

जुतीत किती फरक झालेला दिसत आहे, शेती उत्तम; व्यापार मध्यम व नोकरी कनिष्ठ, अशी म्हण होती; पण हल्ली सुशिक्षित लोक नोकरीकरितां किती हपापलेले दिसतात ! पूर्वीची या लोकांमधील विद्येकरितां विद्या शिकण्याची बुद्धि पार नाहीशी झालेली दिसत असून तिच्याऐवजी ऐहिक हेतूं करितां निवळ पोटाचा धंदा म्हणून शिकावयाची प्रवृत्ति झाली आहे, आणि म्हणून कनिष्ठ नोकरीबद्दल आतां कांहीएक दिक्कत न वाटतां ज्याला त्याला शिकून नोकरी मिळविण्याची हांव दिसत आहे. ही प्रवृत्ति कमी होणे आवश्यक असून अशा प्रकारची हांव थोडी कमी झाल्यासारखी दिसू लागली आहे, ही आनंदाची गोष्ट आहे.

 "बरें, सरकारी नोकरी करावयाची, ती तरी उत्तम नेकीने व नोकराच्या कर्तव्यकर्माला जागून होत आहे का ? सरकारी नोकरांच्या खऱ्या कर्तव्याची जाणीव हिंदुलोकांच्या कवींना चांगलीच होती, असे दिसते. कारण पंचतंत्रांत म्हटले आहे:-

नरपतिहितकर्ता द्वेष्यतां याति लोके;
जनपदहितकर्ता त्यज्यते पार्थिवेन;
इति महति विरोधे वर्तमाने समाने
नृपतिजनपदानां दुर्लभः कार्यकर्ता !

 " खरोखरी सरकारी नोकर म्हणजे ते लोकांचे आणि राजाचे असे दुहेरी नोकर असतात. प्रत्यक्ष ते सरकारचे नोकर असतात, पण लोकांकडूनच कराच्या रूपाने घेतलेल्या पैशाने त्यांना वेतन मिळतें, अर्थात लोकांचेही हित पाहणे हे त्यांचे काम आहे. म्हणजे सरकार व प्रजा यांच्यामध्ये समतोल कांटा धरून वागणे, हे यांचे खरे कर्तव्य आहे. परंतु असे वागणारे किती विरळा ! हल्ली हिंदुस्थानांतील सरकारी नोकरांत अशा जाणीवेचे काही लोक आहेत खरे; पण बहुतेक नोकरांमध्ये कर्तव्य. बुद्धीचा अभाव, ज्या सरकारची नोकरी करावयाची, त्याच सरकारच्या धोरणाची खा नालस्ती करणारे, सरकारावर ओंठ चावणारे, सरकार जुलमी आहे व लोकांच्या अनहिताच्या गोष्टी करते, असें मागून बोल सा ... ४

४९