पान:तीन तत्वज्ञानी.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे, साक्षरांची संख्या भूमितिश्रेढोने वाढत आहे, आणि यामुळे वाचनाची गोडी लोकांना लागत आहे. मात्र बहुतेक लोकांना वाचावयाची पुस्तके शास्त्रीय, ऐतिहासिक, निबंधपर चालत नाहीत; कारण अशा वाचनाला थोडे मानसिक श्रम लागतात. तेव्हां असे ग्रंथ जरा जड वाटतात, व ते आम्हांला पचत नाहीत. पण कल्पित कथा, मनोरंजक गोष्टी, कादंबऱ्या आणि नाटके, ही वाचावयाला चालतात. कारण ही वाचण्याला हलकी जातात. आरामखुर्चीवर पडून सहज अर्धवट झोपेत मनाला त्रास न देतांही अशी पुस्तके भराभर वाचतां येतात. यामुळे गेल्या पांचदहा वर्षांत अशा वाङ्मयाचा महाराष्ट्रांत अगदी पाऊस पडूं लागला आहे ! निवळ करमणूक करणारी अशी नवी नवी मासिकें प्रत्यही निघत आहेत, आणि त्यांची संख्या आज बरीच झाली आहे. गोष्टी वाचतांना सुद्धा कमी त्रास व्हावा, म्हणून त्या गोष्टींना चित्रांची जोड देण्याचीही प्रवृत्ति वाढत आहे. अशा नियतकालिक मासिकांखेरीज किती तरी माला प्रसिद्ध होत आहेत. हे सर्व वाङ्मय इतक्या घाईने आणि जलदीने प्रसिद्ध होत आहे की काही विचारूं नका ! एका मालेची दोन चार घुष्पं निघाली नाहीत, तो दुसरी माला निघते! 'एकआणामाला' निघाली की तिच्या पाठोपाठ 'अधीआणामाला', 'पैसामाला' निघते ! कुसुम माला निघाली को, तिचे लागोपाठ पुष्पमाला ठेवलेलीच! या सर्व माला म्हणजे लहान लहान गोष्टी होत, व या इतक्या जलद निघतात तरी कशा ? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. या स्वयंस्फूर्तीने प्रतिभारूपी जिवंत झऱ्यापासून निघालेल्या नसतात. त्या अशा असत्या तर निदान आमच्या मनःसामथ्यांचे व जोमाचे आविष्करण झाले असते. पण यांतील बहतेक गोष्टी इंग्रजा मासिकांतून व इग्रजी पुस्तकांवरून कशा तरी रूपांतर करून घेतलेल्या असतात, व असे रूपांतर करतांना गोष्ट चोरलेली दिसू नये म्हणून त्यांत अद्भुत प्रसंग घालून त्या गोष्टी जास्त चटकदार करण्याचा प्रयत्न केलेला असतो, किंवा आपल्या इकडील सन्मान्य व्यक्तींच्या किंवा सुधारणेच्या टवाळीचा गरमागरम मसाला घालून तरी त्या गोष्टी चवदार केलेल्या असतात.

 पण या वाङमयाच्या दिखाऊ प्रसारावरून आमचे मनोमांद्य मात्र