पान:तीन तत्वज्ञानी.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५)
फलश्रुति.


 कोणतीही कथा अथवा राण पुरे झाले म्हणजे शेवटी त्याची फलश्रुती सांगण्याची रीति पुरातनच आहे, तदनुरूप साक्रेटिसाच्या कथेचा विषप्राशनाचा लेख लिहून झाल्यावर मी त्या कथेची फलश्रुती सांगण्याचा विचार मनांत आणिला, आणि हातांत लेख लिहिण्याकरितां लेखणी घेतली. पण, आतां फलश्रुति काय सांगावयाची, हे सुचेना. नेहमींच्या पुराणपद्धतीप्रमाणे " जो कोणी हे पुराण श्रवण करील, पठण करील किंवा मनन करील, तो निपुत्रिक असल्यास पुत्रवान् होईल, निर्धन असल्यास धनसंपन्न होईल, पुत्रपौत्रादिकांसह तो इहलोकीं मान्य होईल, व सर्व पापांपासून मुक्त होऊन देहत्यागानंतर परलोकीहि पूज्य होईल," अशी अंधश्रद्धात्मक फलश्रुति, ज्याचे आयुष्य अंधश्रद्धेचा नायनाट करण्यांत गेले, त्या पुरुषाच्या चरित्राची सांगणे म्हणजे विपरीतच होय, असे वाटले. बरें इसाबनीतीच्या गोष्टीच्या शेवटी तात्पर्य सांगतात, त्याप्रमाणे ' मरतांना आनंदाने हा लोक सोडावा, ' इतकीच फलश्रुति सांगून स्वस्थ बसावे तर तसे करणे बरे वाटेना. बरें, साक्रेटिसाच्या उपदेशाचा सारांश देऊन त्याचा अनुवाद करावा म्हटले, तर तोहि मार्ग स्वशक्तीच्या बाहेरचा वाटला. याप्रमाणे काय करावे काय नाही, अशा मनाच्या परिस्थितीत माझा डोळा लागला, व मला असे स्वप्न पडले, की, मी कोठे तरी अंतरिक्षांत वरवर जात आहे. वर जातांना मला निरनिराळे अंतरिक्षांतील लोक लागले, आणि शेवटी मी एका लोकीं येऊन थडकलों; तेथे पाहूं लागलों, तो निरनिराळ्या थोर पुरुषांच्या आकृति दिसू लागल्या. त्या आकृतींत एक आकृती मोठमोठ्याने

४६