पान:तीन तत्वज्ञानी.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साक्रेटिस.

आयुष्य बहुतेक संपत आले आहे, त्या आयुष्याचा अधाशीपणाने संग्रह करण्याबद्दल मी आपल्याला तुच्छ मानूं लागेन. म्हणून मी म्हणतो, त्याप्रमाणे करण्याचे नाकारूं नका."

 तेव्हां जवळ असलेल्या आपल्या गुलामाला क्रिटोनें खूण केली. तो गुलाम बाहेर गेला व थोड्या अवकाशाने तयार केलेल्या विषाचा पेला हातांत घेतलेल्या माणसासह तो परत आला.

 त्या माणसाला पाहून सॉक्रेटिस त्याला म्हणाला, “ मला काय करावयाचे याची तुला सर्व माहिती आहे ?"

 त्याने उत्तर दिले, " फक्त हे तुम्ही प्राशन करा, व पाय जड होईपर्यंत इकडे तिकडे हिंडा व मग पडून रहा. म्हणजे विषाचा आपोआप परिणाम होऊ लागेल."

 असे म्हणून त्या माणसाने तो पेला सॉक्रेटिसाला दिला, व चेहेत किंवा आकृतीत यत्किंचितही फरक न होऊ देतां व न कापतां मोठ्या आनंदाने सॉक्रेटिसाने तो घेतला.

 आपल्या नेहमींच्या स्थिर नजरेने त्या माणसाकडे पाहून सॉक्रेटिसाने त्याला विचारले, " या पेल्यांतून देवाचें तर्पण करण्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे ? मी करूं की नको?"

 तो मनुष्य म्हणाला, "आम्ही एका माणसाला पुरेल इतकेंच विष तयार करतो."

 सॉक्रेटिस म्हणाला, “मी समजलों; पण मला तर्पण करावयाला हरकत नाही, व देवाची प्रार्थना मला केलीच पाहिजे. म्हणजे माझा येथपासूनचा प्रवास सुखाचा होईल. हीच माझी प्रार्थना, तरी त्याप्रमाणे घडो."

 इतके बोलून साक्रेटिसाने तो पेला तोंडाला लावला व त्यांतील विष त्याने अगदी शांतपणाने व आनंदाने पिऊन टाकले, हे होईपयेंत सॉक्रेटिसाच्या स्नेहीमंडळीने आपले दुःख बरेच आवरून धरले होते; परंतु त्याला विष पितांना व तें संपवून टाकतांना त्यांनी पाहिले, तेव्हां त्यांचे

४३