पान:तीन तत्वज्ञानी.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

खात्री असणे शक्य आहे, तितकी माझी खात्री आहे. मी चांगल्या धन्यांजवळ जाणार आहे. व म्हणूनच मला मरणाबद्दल दुःख होत नाही. माझा असा दृढ समज आहे की, मेलेल्यांना पुढे काही एका प्रकारचे आयुष्य आहे व ते आयुष्य दुष्टापेक्षां सद्गुणी माणसांना जास्त सुखावह असते."

 सीमीयस म्हणाला, "बरें, पण आपण हा आपला समज आपल्याजवळच ठेवून जाणार की, आम्हांलाही त्याचा फायदा देणार ? असें दिसते की, या समजांत आमचाही हितसंबंध आहे. शिवाय जर तुम्ही आमची आपल्या म्हणण्याबद्दल खात्री केली तर तुमच्या वर्तनाचे तुम्ही समर्थन केल्यासारखे होईल."

 सॉक्रेटिस म्हणाला, " मी प्रयत्न करून पाहतों, पण क्रिटो माझ्याजवळ बोलायला पाहतो आहे असे मलावाटते. तर प्रथमतः त्याचे म्हणणे ऐकू या."

 क्रिटो म्हणाला," सानेटिस, मला फक्त हेच सांगावयाचे आहे की, तुम्हाला विष देण्याचे काम ज्या माणसाचे आहे त्याने मला तुम्हाला असें बजवायला सांगितले आहे की आपण फार बोलू नका. कारण बोलण्याने मनुष्याचे रक्त तापते व मग विषाचा परिणाम उष्णतेने कमजोर होतो. जे लोक आपले रक्त तापवून घेतात, त्यांना केव्हां केव्हां २ किंवा ३ वेळां सुद्धां विषप्राशन करावे लागते.”

 साक्रेटिस म्हणाला, "बरे तर मग. त्याला आपल्या कामाला लागू दे व दोनदां किंवा गरज लागल्यास तीनदां मला विष देण्याची त्याची तयारी असू दे, म्हणजे झाले."

 क्रिटो म्हणाला, " तुम्ही हेच उत्तर द्याल, हे मला ठाऊक होते. परंतु त्या माणसाचा फार आग्रह होता.”

 सॉक्रेटिस म्हणाला, " त्याच्या म्हणण्याकडे लक्ष्य देण्याचे कारण नाही, पण आपण आपल्या वादविषयाकडे वळू."

 इतके प्रस्तावनारूप संभाषण झाल्यावर सॉक्रेटिसाने प्रथमतः तत्वज्ञान ही एक प्रकारची मरणमीमांसा कशी आहे, हे सिद्ध केले व नंतर आत्मा

३८