पान:तीन तत्वज्ञानी.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साक्रेटिस.

अमर आहे, हा आपला समज कसा खरा आहे, याबद्दल विवेचन केले, सीप्त व सीमीयस यांनी शक्य तितके आक्षेप घेतले, परंतु या सर्व आक्षेपांचे साक्रेटिसाने खंडन केले व आपले म्हणणे प्रमाणांनी सिद्ध केले. परंतु हा सर्व वादविवाद व त्यांतील प्रमाणे ही सॉक्रेटिसाची नसून त्या प्रमाणांमध्ये प्लेटोचे सर्व तत्वज्ञान व त्याची विशेष मते यांवरच भिस्त ठेवली असल्यामुळे हा भाग बराच गहन व काहींसा रुक्ष आहे व तो माझ्या वाचकांना कंटाळवाणा वाटण्याचा फार संभव आहे, म्हणून त्या वादविवादाचा अनुवाद येथे देत नाही. शिवाय साक्रेटिसाच्या चरित्राच्या दृष्टीने त्याचा काही उपयोग नाही.पण हा आत्म्याचा वाद सॉक्रेटिस बहुतेक सर्व दिवसभर करीत होता. वादाच्या शेवर्टी सॉक्रेटिसाने मरणानंतर आत्मा आपापल्या पापपुण्याप्रमाणे निरनिराळ्या लोकी कसा जातो, व तेथे त्याला आपल्या चांगल्या वाईट कृत्यांबद्दलचे योग्य बक्षीस किंवा शिक्षा कशी होते याबद्दलची आख्यायिका सांगितली. ही गोष्ट अतींद्रिय असल्यामुळे प्रमाणांनी सिद्ध करतां येण्यासारखी नाही, असेही त्याने कबूल केले व नंतर तो म्हणाला, " मी वर्णन केल्याप्रमाणे हुबेहूब स्थिति आहेच, असें समंजस मनुष्य आग्रहाने सांगणार नाही. पण आत्मा व त्याचा पुढील निवास यांसंबंधी असे काही तरी असावे, असे मला वाटते. कारण आत्मा अमर आहे, एवढे आपण सिद्ध केले आहे. तेव्हां पुढील वर्णनावर भरवसा ठेवणे बरें, व मनांत शंका आल्यास त्या असल्या गोष्टीच्या मंत्रांनी मनांतून घालवून लावणे रास्त. म्हणूनच जर मनुष्याने शरीर व विषयसुख यांची पर्वा न रतां विद्याधन व सद्गुणधन मिळविण्यांत आपला वेळ खर्च केला असेल,तर त्याने आपल्या आत्म्या बद्दल काळजी न करतां आनंदाने मरणाला राजी असले पाहिजे. सीब्स सीमीयस व माझ्या इतर स्नेह्यांनो ! तुम्ही सर्व आपापल्या योग्य वेळी या प्रवासावर निघाल. पण कविवचनाप्रमाणे दैवाने मला आतां बोला. विले आहे, तेव्हां मी स्नान करून तयार व्हावे, हे बरे. कारण, विष

३९