पान:तीन तत्वज्ञानी.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साक्रेटिस.


इच्छा शहाणा करील, यात शंका नाही. पण ही विचारसरणी जर खरी आहे तर आतां आपण म्हणतां त्याच्या उलटच अनुमान निघते. शहाण्या माणसाला मरणाबद्दल वाईट वाटले पाहिजे, व मूर्खाला आनंद वाटला पाहिजे.

 या सीन्सच्या म्हणण्याने सॉक्रेटिसाला आनंद झाल्यासारखा दिसला. त्याने आमच्याकडे पाहिले व म्हटले, " सीबस, हा नेहमी प्रमाणांची छाननी करतो. त्याला निव्वळ दुसऱ्याच्या विधानाने कधीच समाधान होत नाही."

 सीमीयस म्हणाला, " होय, सॉक्रेटीस, पण सीन्स म्हणतो, त्यांत कांहीं तरी तथ्य आहे, असे मलाही वाटते. खऱ्याखुऱ्या शहाण्या माणसांनी आपल्यापेक्षा चांगल्या धन्यापासून पळून जाण्याची व त्याची चाकरी चटकन् सोडण्याची कां इच्छा करावी ? मला वाटते की, सीन्सच्या म्हणण्याचा सर्व रोख तुमच्याकडे आहे. कारण आपल्याच म्हणण्याप्रमाणे जे देव इतके चांगले धनी आहेत, त्यांना व आम्हांला तुम्ही सोडून जाण्याला इतके उत्सुक झाला आहां."

 सॉक्रेटीस म्हणाला, "तुमचे म्हणणे रास्त आहे. मी न्यायाच्या कोर्टात असल्याप्रमाणे तुमच्या आरोपाचे खंडन केले पाहिजे, असे तुमचे म्हणणे."

 सीमीयस म्हणाला, "होय. हाच आमचा आशय आहे."

 सॉक्रेटिस म्हणाला, "बरें तर माझ्या खटल्याच्या चौकशीच्या वेळी माझ्या हातून माझ्यावरील आरोपाचे निरसन न्यायाधिशांना पटेल अशा तऱ्हेनें झाले नाही. आतां तरी ते तुम्हांला पटण्यासारखे होवो, म्हणजे झाले. सीब्स व सीमीयस, चांगल्या व शहाण्या देवांच्या सहवासांत व या मर्त्यलोकांच्यापेक्षा चांगल्या लोकांच्या सहवासांत माझ्या मरणानंतर मला रहावयाला सांपडेल, अशी जर माझी समजूत नसती तर मला मरणाबद्दल खरोखरी वाईट वाटले असते. पण मी चांगल्या लोकांच्या सहवासांत राहणार अशी मला आशा आहे. अशा अतींद्रिय गोष्टीबद्दल जितकी

३७