पान:तीन तत्वज्ञानी.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

घाबरगुंडी वळून तो तिमाजी नाईक आपली सर्व संपत्ति यमराजाला देऊन टाकून जीव घेऊन धूम ठोकीत घराची वाट धरील, यांतः शंका नाही. परंतु ज्याप्रमाणे प्राणिमात्राला समान असलेल्या षड्रिपूंवर आपली विवेकबुद्धि व मनोदेवता या दोन शक्तींच्या योगें मनुष्य विजय मिळवितो, त्याचप्रमाणे याच दोन शस्त्रांच्या सहाय्याने तो आपला अत्यंत प्रिय जीवहि आनंदाने सोडण्यास तयार होतो. खरी साधुवृत्ति अशा विजयातच आहे. व अशा साधुकोटी पैकीच साक्रेटिस होता, हे आतांपर्यंतच्या त्याच्या आयुष्यक्रमावरून आमच्या वाचकांना समजून आलेच आहे. आता या साधुपुरुषाचे मरणसमयीं वर्तन कसे होते हे त्याच्या आयुध्यांतील शेवटच्या दिवसाची साग्र हकीगत देऊन वाचकांना दर्शविण्याचा मानस आहे.

 साक्रेटिसाला मरणाची शिक्षा झाली होती, हे वाचकांना स्मरत आहेच. परंतु अथेन्सच्या नेहमीच्या चालीप्रमाणे त्या संस्थानचे गलबत त्याच संघींत धार्मिक सफरीवर गेले. व ते परत येईपर्यंत साक्रेटिसाची शिक्षा तहकूब राहिली होती. तें गलबत परत आल्यावर दुसऱ्याच दिवशी साक्रोटेसाची शिक्षा अमंलांत यावयाची होती. यामुळ ज्या दिवशी संस्थानचे गलबत परत आल्याची बातमी शहरांत पसरली, त्याच्या दुसऱ्या दिवशी अगदी उजाडत साक्रोटसाची शिष्य मडळी व मित्रमडळी आपल्या पूज्य गुरूचे व मित्राचे शेवटचे दर्शन घेयाकारेतां व त्याच्या शेवटच्या संभाषणाचे पान करण्यासाठी तुरुंगाच्या बाहेर जमली. त्या दिवशी पहांटेलाच साक्रेटिसाच्या पायांतील बिड्या काढण्यांत आल्या होत्या. प्रथमतः साक्रेटिसाच्या बायकामुलांना आंत धाडण्यांत आले. साक्रेटिसाची बायकामुले फार रडू लागली, म्हणून साटिसाने लवकरच त्यांना परत लावून तो आपल्या आवडत्या शिष्यामित्र मंडळींत येऊन बसला, व आपल्या हाताने आपले पाय चोळीत चोळीत म्हणाला " मनुष्य ज्याला सुख म्हणतात, ती किती विचित्र वस्तु आहे! सुखाच्या उलट असलेले जे दुःख त्याच्याशी सुखाचा किती आश्चर्यकारक

३२