पान:तीन तत्वज्ञानी.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साक्रेटिस.

आही तुमचे संगोपन व पालनकर्ते, तेव्हां यांत कृतघ्नपणाचा दोष येतो. व शेवटी तुमचा आमचा करार झालेला तेव्हां यांत करार मोडण्याचा दोष येतो. शिवाय, खटल्यास सुरुवात होण्यापूर्वी कायद्याप्रमाणेच तुम्हाला हा देश सोडून जाण्याची मुभा होती. त्या वेळी जे करणे तुमच्या हाती होते ते तुह्मी केले नाहीत व आमच्या निकालावर विसंबून राहिलां. तुम्हाला तुमचा निरपराधीपणा शाबीत करण्याचीहि पूर्ण मुभा होती. अशा सर्व गोष्टीची तुह्माला सलवत असताना तुमच्याकडून त्यांचा अवलंब झाला नाही व आतां तुमच्याविरुद्ध निकाल झाल्यावर तुम्ही देशांतर करण्याचे मनांत आणतां, याला काय ह्मणा ? समजा, तुझी दुसऱ्या देशांत पळून गेलांत तर तेथे तुम्हाला या पुढे सुख लागेल काय ? तुमच्याकडे लोकवांकड्या नजरेनेच पाहणार. तुम्ही कायद्यांना धाब्यावर बसविणारे, असेंच लोक समजणार. सुव्यवस्थित राज्य पद्धतीच्या देशांत तुमाला लोक राहूं देणार नाहींत. कारण, तुम्ही आपल्या वर्तनाने अशा व्यवस्थेविरुद्धच बंड केल्यासारखें होईल व या आपल्या पळपुट्या वर्तनाने तुम्ही तुमच्या प्रतिपक्षीयांच्या म्हणण्याचे समर्थनच कराल, थेसलीसारख्या अव्यवस्थित व बेबंदशाई देशांत कदाचित् तुम्हाला राहूं देतील; परंतु तेथे तुमी काय करणार ? सद्गुण, न्यायीपण', सुव्यवस्थितपणा व कायदापालन यांविषयीं तुह्मी तेथे बोलणार काय? परंतु या गोष्टींचा तेथे गंधहि नाही. शिवाय, तुमच्या ह्मणण्याला कोण मानील ? कारण, तुमच्या प्रत्यक्ष वर्तनाने तुह्मीं या गोष्टी जीवापेक्षां व सुखनिवासापेक्षा कमी महत्त्वाच्या आहेत असे दाखविले आहे. तेव्हा थेसलींत तुह्मांला सन्मान्य शिक्षक ह्मणून राहतांच येणार नाही तर लोकांचा दास व खुषमस्कऱ्या अशा तऱ्हेनेंच रहावे लागेल व अशा वागण्यांत जर तुम्हाला सुख वाटेल तर तुमच्या आजपर्यंतच्या सदगुणच्या गौरवाच्या गप्पा होत असें लोक समजणार नाहीत काय? तेव्हां साक्रेटीस आह्मी ह्मणतो त्याचा विचार करा. आही कायद्यांनीच तुमचे सर्वस्वीं संगोपन केले आहे. तरी मुलाबाळांचा विचार करूं नका, आपल्या जीवाचा विचार करूं नका, किंवा न्यायापलीकडे दुसऱ्या कोणत्याहेि

२९