पान:तीन तत्वज्ञानी.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्वज्ञानी.

तांना जर मरणाची भीति मनांत आगली नाही, तर हा माझा व्यवसाय मला देवानेच लावून दिला आहे तेव्हा मी त्याची अवज्ञा कशी करूं? मी जर आता मरणाच्या भीतीने देवाची आज्ञा उलंधिली तर मात्र मेलीटस याला मजवर नास्तिक्याचा आरोप खरोखरी आणता येईल. मला जर तुम्ही म्हणालात, को 'साकेटस ! एक वेळ आम्ही तुला गय करतों परंतु या पुढे हा अपला व्यवसाय थांबीव.' तर मी याला असे उत्तर देईन की, 'अयोनियन लोकहो ! मला तुमच्याबद्दल अत्यंत आदर व प्रेम वाटते. परन्तु तुमच्यापेक्षा मी देवाच्या आशेला जास्त मान देतों व जोपर्यंत माझ्या जिवात जीव आहे व जोपर्यंत माझ्या व वाचेतून शब्द निघत आहे तोपर्यंत मी सत्यपरीक्षणचा व्यवसाय व तुम्हांला उपदेश करण्याचा व्यवसाय सोडणार नाही! मी तुमच्या कानी कपाळी तुमच्या अज्ञानाबद्दल तुमच्या कामचुकारपणा बदल तुमची कानउघाडणी करीत राहणार. आपल्या आत्म्याच्या पूर्णतेकडे आपले सर्व लक्ष लावा पैशाकडे किंवा विषयसुखाकडे लक्ष देऊ नका. पैशापासून सद्गुण निघत नाही तर सद्गुणापासूनच पैसा व इतर श्रेयस्कर गोष्टी उत्पन्न होतात, असाच उपदेश मी करीत रहाणार! हाच उपदेश मी तरुण पिढीला करीत आलो आहे व या उपदेशानेच जर मी तरुणांना बिघडवीत असेन तर माझ्या हातून मोठाच गुन्हा होत आहे. अर्थीनियन लोक हो ! तरी तुम्ही अनीटसचें ऐकून मला शिक्षा तर करा, किंवा माझे ऐकून मला सोडा. परंतु हे ध्यानात ठेवा की, मी हा आपला व्यवसाय कधीही सोडणार नाही. याकरतां जरी मला असंख्य वेळ मरावे लागले तरी बेहेत्तर !

 अथानियन नागरिकहो ! झाले. माझ्याकडून होईल तसें मी आपल्या बाजूचे समर्थन केले आहे. तुमच्यापुढे नेहमी येणाऱ्या आरोपींप्रमाणे आपली बायकामुले पुढे करून तुमच्या मनांत दया उत्पन्न करून आपली सुटका करून घेण्याची रीत आहे. परंतु मी तसे कधीही करणार नाहीं ! मलाही मुलेबाळे आहेत, माझाही संसार आहे, परंतु न्यायाविशाचे काम न्याय करणे हे होय व आरोपीने आपल्या निरपराधीपणाची

२०