पान:तीन तत्वज्ञानी.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साक्रेटिस.

प्रश्नपद्धतीचे ते आपापसांत अनुकरण करीत व या पद्धतीचा प्रयोग दुसयावरही करीत.

 " याप्रमाणे ज्या लोकांचे अज्ञान बाहेर पडे ते लोक आपल्यावर रागावण्याऐवजी मजवर रागावत व साक्रेटिस हा तरुणांना बिघडवितो, अशा प्रकारचा आरोप मजवर करीत. हे आरोप तुम्ही लहानपणापासून ऐकत आला आहांत व येवढ्याशा थोड्या वेळांत तुमचे दुराग्रह काढून टाकणे कठीण आहे. परंतु मी जे सांगितले आहे ते सर्व खरे आहे. मी कांहीं एक चोरून ठेवले नाही, किंवा काहीएक गाळले नाही. आहे तसे स्पष्टपणे सांगितले आहे व हा माझा स्पष्टवक्तेपणाच मला नेहमी भोवला आहे व आतांही तो भोवणार.

 " आता मला देशाभिमानी मेलीटसकडे वळले पाहिजे, याचा आरोप असा आहे, " सॉक्रेटिस हा तरुणांना बिघडविणारा व शहरच्या देवतांवर भरंवसा न ठेवतां दुसऱ्याच देवतांवर भरंवसा ठेवणारा वाईट मनुष्य आहे.' आतां मी तरुणांना बिघडवितों हा आरोप मेलीटसने फारसा विचार न करता केला आहे असें मी त्याची प्रत्यक्ष तुमच्यापुढे उलट तपासणी करून दाखवितो. (साकेटीस मेलीटसची उलट तपासणी न्यायाधीश सभेपुढे घेतो.) "अथीनियन लोकहो ! पाहिलेत तुम्ही की मेलीटसने याविषयीं मुळीच विचार केला नाही, असें त्याच्या विसंगत विधानांवरून स्पष्ट होत आहे. तोच प्रकार दुसऱ्याही आरोपाचा आहे. त्यांतही सर्वस्वी विसंगतपणाच भरलेला आहे. परंतु तुमच्यापैकी कोणी विचारील 'साक्रेटिस ! ज्या व्यवसायामळे तुमच्या जीवावर येऊन बेतली, असा व्यवसाय चालू ठेवण्याचे तुमच्या मनांत येते कसे ? याला माझे उत्तर म्हणजे माझा सर्व आयुष्यक्रमच होय. कोणत्याही माणसाने आपले कर्तव्यकर्म आपल्या आयुष्याची पर्वा न करता केले पाहिजे. मी तीन वेळां तुमच्या सेनापतीच्या हाताखाली काम केले व या तीनही वेळां मी आपल्या जीवाकडे किंवा सुरक्षितपणाकडे पाहिले नाही. या प्रमाणे सेनापतीची आज्ञा पाळ

१९