पान:तीन तत्वज्ञानी.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

शिखरास पोहोंचले होते. वक्तृत्वकलेची इतकी प्रगति दुसऱ्या कोठेच झाली नाही. आपले संरक्षण करण्यास वक्तृत्वशक्तीची जरूरी असल्यामुळे प्रत्येक नागरिकाला वक्तृत्व आवश्यक होते व वक्तृत्वकला हे तेथल्या शिक्षणाचे एक प्रमुख अंग झाले होते. असो.

 खिस्ती शकापूर्वी ३९९ या वर्षी सॉक्रेटिसावर खटला झाला. खटल्याची नोटिस मेलीटस या कवीने दिलेली होती व खटल्यांत एक धार्मिक आरोप असल्यामुळे अथीनीयन कायद्याप्रमाणे आर्कन नांवाच्या " अधिकाऱ्याने पूर्वतपास केला होता व न्यायसभेचा या दिवशी तोच अध्यक्ष होता. ज्यूरर ५०१ होते. खटल्याचा निकाल योग्य व खऱ्या रीतीने देऊ अशी शपथ घेतल्यावर ज्यूरर लोक चटया आंथरलेल्या लांब बांकावर येऊन बसले. शेजारी असलेल्या प्लॅटफॉर्मवर वादीप्रतिवादी मोरासमोर ठाकले, कठड्याच्या पलीकडे पुष्कळ प्रेक्षक बसले होते. धूपारती व न्यायसभेच्या घोषकाने म्हटलेली प्रार्थना होऊन कामाला सुरुवात झाली. कोर्टाच्या क्लार्कने आरोप व लेखी कैफियत वाचली. आरोप असा होताः -

 "सॉक्रेटिस हा गुन्हेगार आहे. कारण तो संस्थानने मानलेले देव मानीत नाही व त्याने नवीन देवांचा लोकांत प्रसार केला आहे; आणखी तो तरुणांना बिघडवितो."

 नंतर अध्यक्षाने वादीपक्षाच्या लोकांस अग्रासनी येऊन बोलण्यास फर्माविलें. प्रथमतः मेलीटस कवि बोलला. त्याचे भाषण म्हणजे आपल्या देशभक्तीचे व वक्तृत्वकलेचे प्रदर्शन होते! परंतु त्याचे भाषण फारसे चांगले झाले नाही. नंतर अनीटस व लायकन यांची भाषणे झाली. ती जास्त चांगली झाली व त्यांचा ज्यूररवर परिणामही झाला. अनीटस उहणाला, “ साक्रेटिसाशी आपला खाजगी द्वेष नाही व कोटाचे समन्स न मानतां जर साकेटीस देश सोडून जाता तर आपल्याला आनंद झाला असता. परंतु ज्या अर्थी सॉक्रेटिस हजर राहिला आहे त्या अर्थी आतां ज्याची सुटका होणे श्रेयस्कर नाही."

१४