पान:तीन तत्वज्ञानी.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सॉक्रेटिस


वादविवाद लोकांच्या देखत चालत असे व कोणत्याहि माणसाला सर्वोदेखत आपली फजिती झालेली खपत नसे.त्यामुळे सर्व धंद्याच्या लोकांचं साक्रेटिसनें वैर संपादन केले होते.शिवाय, साक्रेटिस हा मोठा सुधारणावादी होता, व प्रत्येक चालीचे, प्रत्येक संस्थेचें, प्रत्येक मताचें व प्रचलित कल्पनेचे युक्तिवादानें समर्थन करतां आलें तर तो खरी असे तो म्हणत असे. यामुळे पुराणमताभिमानी लोकांचेंहि वैर त्यानें संपादन केले होते. याप्रमाणे त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्याविरुद्ध वैराचा अग्नि सारखा धुमसत होता व त्याचा भडका अथेन्समध्ये जुलमी तीस अधिकान्यांची सत्ता जाऊन पुनः प्रजासत्ताक राज्याची स्थापना झाल्याबरोबर झाला. या जुलमी अधिकऱ्याच्यामध्ये कांहीं साक्रेटिसाचे शिष्य होते. यामुळे तर लोकक्षोभांत जास्तच भर पडण्यास कारण झालें. अथेन्सला भोगाव्या लागलेल्या सर्व आपत्तीचें आदिकारण सॉक्रेटिस चे शिक्षण, अशी लोकांची समजूत झाली. तेव्हां हें मूळच नाहींसें करून टाकले पाहिजे असे कित्येकांस वाटून त्यांनी साक्रेटिसावर फौजदारी खैटला करून त्याचा अंत करण्याचा निश्चय केला व तो अथेन्समधल्या न्यायपद्धतीमुळे त्यांना सहज पार पाडतां आला.

अथेन्समधील न्यायपद्धतीची हल्लाच्या काळच्या लोकांना मुळींच कल्पना व्हावयाची नाही. अथेन्सच्या राजकीय सत्तेप्रमाणेंच अथेन्सची न्यायपद्धतीही पूर्ण लोकसत्तात्मक होती. तेथें आधी लिहिलेले असे कायदे नसत, निष्णात न्यायाधीशही नसत, सामान्य लोकांची ज्यूरी असे. परंतु ही ज्यूरी इंग्रजी पद्धतीप्रमाणे न्यायाधीशास सल्ला देण्यापुरतीच नसे, तर सर्व न्यायाचे अधिकार ज्यूररच्या मताधिक्यावर अवलंबून असत व ज्यूररची संख्याही फारच मोठी असे. म्हणून अथेन्समधील न्यायसभा ही लोकसभेप्रमाणे सर्व नागरिकांची सभाच असे वादीप्रतिवादींनी आपापले खटले स्वतःच चालविले पाहिजेत असाही दुसरा एक नियम असे. न्यायसभेच्या अशा घटनेमुळें खटले वादी प्रतिवादींनी स्वतःच चालविण्याच्या नियमानें व कारभाराच्या पूर्ण लोकसत्तावामुळे ग्रीस देशांत वक्तृत्व

१३