पान:तीन तत्वज्ञानी.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

कळत नाही व यामुळे जनता साधुपुरुषाविषयीं भलताच ग्रह करून घेते.'सत्यान्नास्ति परो धर्मः' हे साधुपुरुषाचे वर्तनतत्त्व असते, तर 'बाबावाक्यं प्रमाणम्' हे जनतेचे वर्तनतत्त्व असते; सदसद्विवेकबुद्धि व सुविचार यांच्या पायावर उभारलेल्या शास्त्रावर खऱ्या साधूची भिस्त असते, तर दुराग्रह, श्रद्धा व 'पिच्छसे आई' रूढी यांवर जनतेची भिस्त असते; खऱ्या साधुपुरुषाची आत्मनिरीक्षण करून स्वतःचे दोष पाहून ते नाहीसे करण्याची प्रवृत्ति असते, तर जनतेला आपले दोष पाहण्याची व ते सुधारण्याची मुळीच संवय नसते; खऱ्या साधुपुरुषाची आपले गुण झांकून दुसऱ्याचे अणुइतकेही गुण मोठे करून दाखविण्याची प्रवृत्ति असते, तर जनतेला आपले गुण फारच मोठे भासतात, दुसऱ्याचे गुण लहान वाटतात व आपल्या डोळ्यांतील मुसळ दिसत नाही परंतु दुसऱ्याच्या डोळ्यांतील कुसळसुद्धा दिसते ! शेवटी, खऱ्या साधुपुरुषाला थातांड व दांभिकपणा मुळीच खपत नाही, त्याला दुसयाचे दोष निस्पृहपणे दाखविल्याखेरीज राहवत नाही व त्याला खोर्टी स्तुति करता येत नाही; तर जनतेची धर्मथोतांड बंड करणारावर व आपल्या छंदाप्रमाणे वागणारावर बहाल मर्जी असते, आणि ती स्तुति प्रिय असते. विशेषतः खऱ्या साधुपुरुषाच्या या शेवटच्या विशेषामुळे लोकांमध्ये त्याला फार शत्रु बनतात व मग ते त्या साधुपुरुषाला त्रास देतात, त्याचा छल करतात व हातांत अधिकार असल्यस त्याचाहि उपयोग करून त्या साधुपुरुषाला शिक्षासुद्धा करण्यास मागे पुढे पहात नाहीत.

 साक्रेटिसाला याच कारणामुळे शिक्षा झाली, त्याची शिक्षण पद्धति वादविवादात्मक होती, हे पूर्वी सांगितलेच आहे. तो व्याख्यानरूपाने उपदेश करीत नसे, तर भेटेल त्याला त्याच्या विषयाविषयीं उलट सुलट प्रश्न विचारून त्याला कुंठित करी व त्याचे अज्ञान त्याला दाखवून देई व मग त्याला आणखी प्रश्न विचारून जवळून सत्यरूप उत्तरे काढून त्याला उपदेश करी. हा सर्व