पान:तीन तत्वज्ञानी.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

उपयोग झाला नाही, ही गोष्ट निराळी. कारण अथीनीयन कायद्याप्रमाणे लोकसभेचा अध्यक्ष रोज बदलावयाचा असे. तेव्हां दुसऱ्या दिवसपर्यंत हे काम तहकूब करून सेनापतीविरुद्ध असलेल्या लोकांनी आपली सूचना दुसऱ्या दिवशींच्या अध्यक्षामार्फत पुढे ठेवून मग पास करून घेतली.

 आतां अशा तऱ्हेचा एकच प्रसंग सांगावयाचा राहिला. तो तिसांच्या अनियंत्रित कारभाराच्या कारकीर्दीतील होय. या तीस जुलमी अधिकाऱ्यांच्या कारकीर्दीत त्यांनी पांच नागरिकांना सलमीसमध्ये जाऊन लिऑन या नांवाच्या निरपराधी मनुष्यास पकडून आणण्यास सांगितले. या जुलमी अधिकाऱ्यांचा उद्देश आपल्याबरोबर बऱ्याच लोकांना जुलमी व अन्यायाच्या कृत्यांत सामील करून घ्यावयाचा होता; परंतु या पांचांमध्ये साक्रेटीस होता. असें अन्यायाचे काम मी कदापि करावयाचा नाही, असे सांगून साकेटीस संथपणे घरी गेला. या त्याच्या उद्दामपणाबद्दल त्या जुलमी अधिकाऱ्यांनी साक्रेटिसावर कड्याळ आणले असते. परंतु असे करण्यास त्यांना संधि सांपडण्यापूर्वी त्यांची अथेन्समधना उचलबांगडी झाली.

१०