पान:तीन तत्वज्ञानी.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साक्रेटिस.

व लोकांची विचारजागृति करण्यांतच गेल्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये सांगण्यासारख्या गोष्टी थोड्याच आहेत. परंतु ज्या थोड्याशा आहेत, त्यांवरून सॉक्रेटिस हा 'बोले तैसा चाले । त्याची वंदावी पाउलें ॥' या कोटीपैकीं होता, हे मात्र स्पष्टपणे दिसून येते.

 सॉक्रेटिसाचा अशा तऱ्हेचा आध्यात्मिक व्यवसाय असल्यामुळे त्याने राजकीय बाबतींत कधीही मन घातले नाही. मात्र राजशास्त्राच्या तात्त्विक प्रश्नाबद्दल आपल्या संभाषणांत तो नेहमी ऊहापोह करीत असे, प्रत्येक ग्रीक नागरिकास लष्करी काम करावे लागे व त्याला लष्करी शिक्षणही मिळत असे. त्याप्रमाणे सॉक्रेटिसाला लष्करी शिक्षण मिळालेले होते व साक्रेटिस हा तीन लढायांत हजरही होता. या सर्व वेळी तो मोठ्या धैर्याने लढला व तो सामान्य शिपाई असतांना सुद्धा त्याच्याबद्दल प्रशंसापर उद्गार मोठमोठ्या कामगारांनी काढले. पहिली लढाई पाटीडिया येथे झाली; तेव्हां सॉक्रेटिसाचे वय ३६ वर्षांचे होते. या लढाईत व स्वारीत तो कसा वागला त्याचे वर्णन त्याचे वर्तन प्रत्यक्ष पाहिलेल्या त्याच्या एका शिष्याने केले आहे. या लढाईत आलसिबायडिस व सॉक्रेटिस एके ठिकाणी रहात असत व जेवीत असत व त्याने सॉक्रेटिसाच्या या स्वारीतील वागणुकीचे खालीलप्रमाणे वर्णन केले आहे.

 " साक्रेटिसचा विलक्षण सोशिकपणा प्रत्यक्ष पाहण्याची संधि मला येथे मिळाली. त्याचा सोशिकपणा अगदी अद्वितीय होता. ह्या स्वारीत असतांना काही दिवस शिधासामुग्री मिळण्याचा मार्ग शत्रूनी बंद केला व शिपायांना उपास काढण्याची वेळ आली. परंतु या बाबतींत सर्व शिपायांत सॉक्रेटिसाचा नंबर वर लागला. तसेच थंडी सोसण्यांतहि त्याची कमाल होती. त्या वर्षाचा हिवाळा फार कडक होता व बर्फ खुपच पडले होते. अशा वेळी सर्व शिपाई तंबुच्या बाहेर पडत नसत अथवा पडलेच तर अंगावर कल्पनातीत कपडे घालून पायाला पिसे व फलाणी घांन बाहेर पडत. परंतु अशा थंडीत साकेटीस नेहमीसारखा अनवाणी