पान:तीन तत्वज्ञानी.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

सॉक्रेटिसाने स्वतः होऊन आपले विचार केव्हाही टिपून ठेवले नाहीत. मागे सांगितल्याप्रमाणे ते काम, त्याच्या शिष्यांपैकी झेनाफन व प्लेटो या दोन शिष्यांना केले. परंतु तुकारामाने आपल्या अभंगांची टिपणे ठेवली व तुकारामाने स्वतः तयार केलेले अभंग आज आपल्याला उपलब्ध आहेत. तुकारामाच्या नावाखाली मोडणारे सर्वच अभंग खुद्द तुकारामाने केलेले आहेत किंवा नाही ते खात्रीन सांगता येत नाही. परंतु त्यांतला बराचसा भाग तुकारामाच्या हातचा आहे यांत सदेह नाही.
 आणखी एका महत्त्वाचे बाबतींत या दोन साधूंमध्ये फरक आहे तो त्यांच्या मोक्षप्राप्तीच्या मार्गामधील होय. तुकाराम हा भक्तिमार्गी होता... तर सॉक्रेटीस हा ज्ञानमार्गी होता. तुकारामाचे हृदय भगवद्भक्तीने ओतप्रोत भरलेले होते. त्याला ध्यानीं, मनी, स्वप्नी " प डुरंगपाय " आठवत होते व अशी निस्सीम पांडुरंगभक्ति करण्यानेच मोक्षप्राप्ति होते असे त्याच्या उपदेशाचे सार होते, तर साक्रेटिसाला ज्ञानाची तळमळ लागलेली होती. मनुष्याचे अज्ञान हे सर्व पापांच व दुर्गुणांचें आदिकारण आहे, तेव्हां मनुष्याने हे आपले अज्ञान नाहीसें केले पाहिजे व सत्य ज्ञान मिळविण्याची खटपट केली पाहिजे म्हणजेच त्याला सद्गति मिळेल, असे सॉक्रेटिसाच्या उपदेशाचे सार होते.
 साक्रेटिसाचा जन्म अथेन्स शहराच्या एका वाडीत खिस्ती शकापूर्वी ४६९ या वर्षी झाला. याच्या बापाचें नांव सोफ्रोन्सिकस असं होते व तो करणाऱ्या पाथरवटाचा धंदा करीत असे. त्याच्या आईचे नांव फेनारेटो असे होते, ही सुईणीचा धंदा करीत असे व या गोष्टीवरून सॉक्रटीस अर्धवट विनोदाने आपल्याला बौद्धिक सुईण म्हणत असे व आपल्या विचारपद्धतीला 'बौद्धिक सुईणपण' असें नांव देई. कारण साकेटीस म्हणे की, " मी सुईणीप्रमाणे स्वतः वांझ आहे. म्हणजे मला स्वतःला ज्ञान नाही किंवा विचारही सुचत नाहीत, परंतु तरुण लोकांच्या डोक्यांत जे विचार घुटमळत असतात त्यांची मी आपल्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीने लवकर सुटका करून त्यांना शब्दस्वरूपांत प्रगट