पान:तीन तत्वज्ञानी.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कँट


ल्याला दिसते. पण ही वस्तुस्थिति आपल्या विवेकाला पटत नाही. तेव्हां आपली सहज भावना होते की, या जगांत परमेश्वर आहे व जरी हल्लीच्या जगांत अशी वस्तुस्थिति असली तरी ती क्षणीक आहे निरंतरची नाही; परमेश्वराच्या घरी सद्गुणाला सुख लाभलेच पाहिजे व दुर्गुणाला शासन झालेच पाहिजे व जगाचा कर्ता तो न्यायी परमेश्वर येथे नाही तर स्वर्गात तरी सदगुणांची व सुखाची सांगड घालून देईल. तेव्हां या सर्व न्यायी परमेश्वराच्या अस्तित्वाच्या कल्पनेने आपल्या नैतिक आकांक्षाचे समाधान होते व असा न्यायी परमेश्वर नैतिक कल्पना असणाऱ्या जगाच्या मूळाशी असलाच पाहिजे अशी आपली विवेकवाणी सांगते व आपल्या नैतिक अनुभवावरून तो आपल्याला श्रद्धेय आहे असेंही वाटते.

 सारांश, बुद्धीला ज्या गोष्टी शास्त्रीयदृष्टया म्हणजे संवेदनात्मक ज्ञानदृष्टया सिद्ध करता येत नाहीत, त्या गोष्टी आपल्या नैतिक अनुभवाने सिद्ध करतां येतात व म्हणून तत्वज्ञान हे बौद्धिक अनुभवाच्या पायावर न उभारतां-कारण तेथें अज्ञेयवाद व जडवाद आपल्याला निरुत्तर करतात-नैतिक अनुभवाच्या पायावर उभारावे असे कँटच्या प्रतिपादनाचें सार आहे व यालाच तो आपले नवे तत्वज्ञान म्हणतो; मात्र आत्मा, परमेश्वर वगैरे अतींद्रिय गोष्टींचे ज्ञान झाले असें न म्हणतां याबद्दल आपली विवेकी श्रद्धा उत्पन्न झाली असे तो म्हणतो. अर्थात् ही तडजोड कँटनें जडवाद्यांचे व अज्ञेयवाद्यांचे तोंड बंद करण्याकरितां सुचविली आहे असे दिसते.

 कँटच्या तिसऱ्या परीक्षणात्मक पुस्तकाचा विषय जडाजड जगांत दिसून येणारे सौंदर्य, भव्यता, प्रयोजन व रचनाचातुर्य इत्यादि गोष्टींचें विवेचन करण्याचा आहे. व या विवेचनावरून या जगाला कोणी तरी चिन्मय कर्ता आहे असे मानवी मनाला वाटावयाला लागते, तेव्हां ज्याप्रमाणे आपल्या नैतिक अनुभवावरून मनुष्यामध्ये परमेश्वराच्या अस्तिस्वाबद्दल श्रद्धा उत्पन्न होते त्याप्रमाणेच मनुष्याच्या सौंदर्यविषयक अनु

११५