पान:तीन तत्वज्ञानी.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

देहाशी संलग्न आहे तोपर्यंत वासनाच्छेद, फलाशाछेद किंवा भावनाच्छेद सर्वांशी होणे शक्य नाही असा आपला अनुभव आहे. पण ही गोष्ट जर अशक्य असती तर विवेकशक्ति अशी निरर्थक व निरुपयोगी आज्ञा कशी करती? केवळ विवेकाची आज्ञा म्हणून वर्तन करणे आपल्याला साध्य झाले पाहिजे तर ती आज्ञा अन्वर्थक होईल, तेव्हां हा आज्ञा एका जन्मांत पाळण्यासारखी नसल्यास तिची पूर्तता पुढल्या जन्मांत होईल व अर्थात असे होण्यास आत्मा अमर असला पाहिजे असे मानण्यास आपण तयार झाले पाहिजे, म्हणजे नीतीच्या कायद्यावरून आत्म्याचे अमरत्व निष्पन्न होते. हे नीतिशास्त्रांतून निघणारे दुसरे गृहीत तत्व होय.

 आतां नीतिशास्त्रांतून निघणारे तिसरे गृहीत तत्व परमेश्वराच्या अस्तिस्वाचे होय. कँटने हे तत्व खालील पद्धतीने सिद्ध केले आहे. आपण मनुव्याच्या पुरुषार्थाच्या कल्पनेचा विचार करूं लागलों म्हणजे श्रेयस व प्रेयस किंवा धर्म व काम किंवा हित व सुख या दुकलीची आठवण होते. म्हणजे या दुकलीपैकी दोन्ही गोष्टी जरी परस्पर भिन्न किंवा विरुद्ध आहेत, तरी त्या एकत्र असाव्या तरच मानवी आयुष्याचे खरे ध्येय साध्य झाले असे म्हणता येईल. सारांश, सद्गुणी मनुष्य नेहेमी सुखी असावा असे आपली विवेकशक्ति सांगते. केवळ सद्गुण किंवा केवळ सुख येवढ्याने मानवी आयुष्याची साफल्यता झाली असें विवेक शक्तीला वाटत नाही. तर खऱ्या आयुष्याच्या साफल्यतेला सद्गुण व सुख याचा सांगड पाहिजे असें विवेक कंठरवाने सांगतो. विवेकाची नैतिक आज्ञा तर निवळ सदगुणांबद्दल आहे, उलट सुखाकडे पाहूं नको असे त्याच म्हणणे आहे. तरी पण अंती सद्गुणी माणसाला सुख व्हावे असे आपत्याला वाटते. तसेच दुर्गुणी माणूस दुःखांत असावासें आपल्या विवेक शक्तीला वाटते. पण आयुष्यांत तर नेहेमी याच्या उलट अनुभव येता.

 दुर्गुणी माणसें वैनीत व सुखांत आहेत असे आपण पाहता तर सद्गुणी माणसें हालअपेष्टा व दु:ख भोगीत आहेत असे आप

११४