पान:तीन तत्वज्ञानी.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कँट


याप्रमाणे कँटने सदसद्विवेकशक्तीचे पृथक्करण करून नीतीनियमाची मीमांसा केली आहे. आतां या पृथक्करणावरून त्यांत कोणती गृहीततत्त्वे समाविष्ट झालेली आहेत, याचे विवेचन करणे क्रमप्राप्त आहे.

 नीतिशास्त्रांतला पहिला सिद्धांत म्हणजे कर्तव्यकर्माची जाणीव होय. "मी अमुक एक गोष्ट केलीच पाहिजे; ते माझे कर्तव्यकर्म आहे.' पण विधानामध्ये माझी स्वतंत्रताशक्ति गृहीत धरली आहे. (I ougbt therefore I can ) माझें कर्तव्यकर्म आहे म्हणजे मला तसे वागण्याची स्वतंत्र शक्ति आहे, बाह्य सृष्टीला लागू असणारा कार्यकारणभाव मला लागू नाही. मी आपल्या सदसद्विवेकशक्तीप्रमाणे वागण्यास समर्थ आहे असें सिद्ध होते बाह्य सृष्टीतील गोष्टींच्या बाबतीत अमुक केले पाहिजे असें आज्ञापक विधाने निरर्थक होय, कारण बाह्य वस्तु सृष्टिनियमानी बद्ध आहेत, त्यांना निराळ्या तऱ्हेनें वागणे शक्य नाही; पण विवेकी मानवप्राण्याला स्वतंत्रता आहे व म्हणून त्याच्या विवेकशक्तीच्या आशेला अर्थ व महत्त्व आहे. तेव्हां नीतिविषयक सदसद्विवेकशक्तीच्या आज्ञेपासून आत्म्याचे स्वतंत्र व कार्यकारणभावरहित अस्तित्व सिद्ध होते. आपली बुद्धि या आत्म्याच्याबद्दल असले विधान करू शकत नव्हती. कारण आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व ही कल्पनाच मुळी अतीन्द्रिय आहे व अशा कल्पनेचा प्रत्यय मानवी बुद्धीला होऊ शकत नाही. पण आतां आपल्या नैतिक अनुभवावरून आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व आपत्याल मानणे भाग आहे. कारण या अनुभवाने,हें एक गृहीत तत्व आहे, असे दिसून येते.

 सदसद्विवेकशक्तीने दिलेल्या नैतिक कायद्यापासून दुसरें एक गृहीततत्व सिद्ध होते ते असें. आपली सदसद्विवेकशक्ति म्हणते की, आपले कर्तव्यकर्म फलाशेने किंवा वासनांनी किंवा भावनांनी प्रेरित होऊन करूं नका तर कर्तव्य म्हणून सदसद्विवेकाची आज्ञा म्हणून करा. सारांश कर्तव्यकर्म करतांना फलाशा वासना किंवा भावना यांचा लेशसुद्धां मनांत वावरू देऊ नका असें विवेक सांगतो. पण जोपयत मानवी आयुष्यसा...८

११३