पान:तीन तत्वज्ञानी.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कँट


आहे. तेव्हां 'कारणरहित कारण' ही कल्पनाच मुळी बुद्धिदृष्टया विसंगत आहे. तेव्हां असा पदार्थ आपल्याला कळणारच नाही.

 परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल विवेकवादी जी प्रमाणे पुढे आणतात तीही सदोष आहेत असें कँटने दाखविले आहे.

 परमेश्वर पूर्ण किंवा सर्वगुणसंपन्न आहे. तेव्हां तो अस्तित्वात असलाच पाहिजे. कारण जर त्याला अस्तित्व हा गुण नसेल तर तो सर्व. गुणसंपन्न होणार नाही. ईश्वराच्या अस्तित्वाचे हे प्रमाण सदोष आहे. कारण येथे आपण कल्पनेवरून अस्तित्वाकडे जातो. 'पूर्ण पदार्थाची' कल्पना आपल्या अपूर्ण पदार्थाच्या कल्पनेवरून सुचते खरी; पण कल्पना म्हणजे खरी सृष्टि नव्हे. कल्पना जर खरी सृष्टि असती तर कविकल्पना किंवा स्वप्नकल्पना ख मानाव्या लागतील. मानवी बुद्धि खऱ्या खोट्याचा निर्णय संवेदनावरून करते व परमेश्वराची कल्पना तशी संवेद्य नाही. तेव्हां तिचे अस्तित्व सिद्ध करणे अशक्य आहे.

 परमेश्वराच्या अस्तित्वाच्या दुसऱ्या प्रमाणांचे विवेकवाद्यांनी असें विवेचन केले आहे. बाह्य जग व मानवी मन अस्तित्त्वांत आहेत यांना काही तरी कारण असलेच पाहिजे व ते कारण परमेश्वर होय. पण कॅटचे मते हे प्रमाणही सदोष आहे. यांत जे तत्व आधिभौतिक शास्त्राला व सेय पदार्थाना लागू आहे ते तत्व अतीन्द्रिय पदार्थाला लागू केले आहे. म्हणूनच सृष्टीचे कारण परमेश्वर तर परमेश्वराचे कारण काय असा जडवादी रोखठोक जबाब विवेकवाद्यांना विचारतात व मग विवकवादी निरुत्तर होतात. कारण विवेकवादी व जडवादी यांमध्ये फारसा फरक राहत नाही. जडवादी 'जडा' शी थांबतात तर विवेकवादी एक पायरी पुढे जातात येवढेच. पण त्या पायरीच्या पुढे काय हा प्रश्न राहतोच. म्हणूनच कॅटचे म्हणणे बुद्धीने हा प्रश्न सुटण्यासारखाच नाही.

 परमेश्वराच्या अस्तित्वाचे तिसरे प्रमाण म्हणजे सृष्टीच्या रचना चातुयांचे प्रसिद्ध प्रमाण होय. या प्रमाणाबद्दल कॅटला नेहेमी आदर वाटत असे; पण बुद्धिदृष्टया या प्रमाणावरून परमेश्वर 'सृष्टीचा विश्वकर्मा'

१०९