पान:तीन तत्वज्ञानी.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कँट


ल्याला तत्वज्ञान साध्य आहे. त्यांने मताप्रमाणे तत्वज्ञानाचे प्रश्न तीन. आत्म्याचे अस्तित्व व अमरत्व या बद्दलचा पहिला प्रश्न, सृष्टीचे यथार्थ व केवल स्वरूप याबद्दलचा दुसरा प्रश्न व परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दलचा तिसरा प्रश्न. हे तिन्ही प्रश्न आपल्या केवल विवेकाने सोडवितां येतात, असें विवेकवादीपंथाचे मत होते. कँटने असे दाखवून दिले की, विवेकवादी यांच्या यासंबंधीच्या विवेचनांत घोडचुका आहेत. व या वस्तूंचे ज्ञान मानवी मनाला होणे शक्य नाही व म्हणून मानवी बुद्धीच्या द्वारे तरी हे पदार्थ अज्ञेय आहेत.

 प्रथमतः आत्म्याच्या आस्तत्वाचा प्रश्न घ्या. आत्म्याची कल्पना आपल्या ज्ञान ला आवश्यक आहे हे कॅटला कबूल आहे सर्व ज्ञानांत 'ज्ञाता' व 'ज्ञेय' हा संबंध आवश्यक असतो व म्हणूनच आत्म्याची जाणीव हैं एक ज्ञानाचे आवश्यक अंग आहे, अस कँटने प्रतिपादन केले आहे. पण हे ज्ञान होण्यास आपल्याला संवेदना आवश्यक आहेत. संवेदना येतील तेव्हांच मला संवेदना भासतात असे ज्ञान होईल, सारांश, आत्म्याच्या जाणिवेचे ज्ञान हे सापेक्ष आहे. ते संवेदनांशी संलग्न आहे. म्हणज विषय व विषयी किंवा ज्ञेय व ज्ञाता, किंवा बाह्य पदार्थ व आत्मा या दुकल सापेक्ष आहेत; त्या दोन्ही वस्तूंचे एकसमयावच्छेदेंकरून ज्ञान होते. अर्थात् दोन्हीही कल्पना आपल्या ज्ञानांत अंतर्भूत आहेत असे ज्ञानाच्या पृथक्करणावरून आपल्याला कळते. पण या आत्म्याचे मूळ स्वरूप काय; त्याचे गुण कोणते, तो अमर आहे काय, तो शरीराखेरीज बाहेर यहूं शकतो काय ? वगैरे प्रश्नांचे उत्तर मिळणें शक्य नाही. कारण हे अतींद्रिय ज्ञानाचे प्रश्न झाले व असें अतींद्रियज्ञान आपल्याला होणे शक्य नाही. कारण ज्ञान मीमांसेवरूनच कळते की संवेदना किंवा इंद्रियद्वारा अनुभव हा आपल्या ज्ञानाला आवश्यक आहे. अर्थात् आपल्या मानवी बुद्धीला अतींद्रियज्ञान शक्य नाही. कारण ती बुद्धि इंद्रियसंवेदनांनी मर्यादित आहे. ती स्वतंत्र शक्ति नाही, ती न उत्पन्न करूं शकत नाही, तर संवेदना अनुभवल्यावर बुद्धि त्यावर संस्कार करूं शकते इतकेंच. पण मानवी ज्ञानाचा पाया

१०७