पान:तीन तत्वज्ञानी.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

वर दिल्याप्रमाणे थोडक्यांत कॅटची मानवी ज्ञानाची मीमांसा आहे. तिचा विशेष हा होय की, संवेदनावादी व विवेकवादी या दोन्ही पंथांच्या तत्त्वज्ञान्यांच्या मतांतील सत्याच्या अंशाचा अंतर्भाव कँटने आपल्या मीमांसेंत केला आहे. संवेदना व विवेक या दोन्हीहि शक्ति मानवी ज्ञानाला आवश्यक आहेत असे त्याने प्रतिपादन केले आहे. व या मीमांसेच्या योगाने त्याने आधिभौतिक शास्त्रांची शक्यता शाबीत केली आहे. आधिभौतिक शास्त्रे गणितशास्त्राप्रमाणे काही तत्वें स्वयंसिद्ध अशी धरतात व त्या तत्वांवरच सर्व आधिभौतिक शास्त्रे अवलंबून आहेत. पण ही तत्वे मानवी ज्ञानाला विवेकज्ञानमीमांसेंत अंतर्भूत झालेल्या कल्पनांच्या द्वारेंच होतात. उ० सर्व ज्ञेय पदार्थाना अवकाश, काल, संख्या व परिमाण हे गुण असतात व म्हणूनच सर्व बाह्य ज्ञेय पदार्थ हे सावयव असून ते विभागतां येतात. आतां आधिभौतिक शास्त्रांतले हे गृहीत तत्त्व ज्ञानाच्या अटीपासून निष्पन्न होते हे उघड आहे. तसेच सर्व वाह्य ज्ञेय पदार्थाना कमीअधिक होणारे सांश गुण आहेत हे तत्त्व सुद्धा ज्ञानाच्या अटीपासून निष्पन्न होते. त्याप्रमाणेच प्रत्येक ज्ञेय वस्तु ही काही तरी कारणाचे कार्य असते हे तत्व सुद्धां ज्ञानाच्या अटीपासूनच निष्पन्न होते. तसेच बाप सृष्टि ज्या जड द्रव्याने बनलेली आहे तें जड तत्व अविनाशी आहे, त्याची जगांत नवी वाढ होत नाही किंवा त्याचा जगांत नाशही कधी होत नाही हे तत्व ज्ञानाच्या अटींतून निष्पन्न होते. सारांश, कटच्या मताने त्याची एकदां ज्ञानमीमांसा गृहीत केली की, आधिभौतिक शास्त्रांचे त्यायोगें समर्थन होतें व मची मानवी ज्ञानाबद्दलची व विशेषतः आधिभौतिक शास्त्राच्या शक्यतेची कुशंका नष्ट होते.

 येथपर्यंत गणितशास्त्र व आधिभौतिक शास्त्रे यांची शक्यता शाबीत करून ह्यूमची चूक कँटने दाखवून दिली. त्याच्या पुस्तकाच्या पुढल्या भागांत मात्र ह्यूमचें व कॅटचे एकमत असून त्यांत त्याने विवेकवादी तत्वज्ञान्यांचे तत्वज्ञानाच्या अस्तित्वाबद्दलचे मत खोडून काढले आहे क अशेयवाद स्थापित केला आहे. विवेकवादी तत्वज्ञान्यांच्या मताने आप

१०६