पान:तीन तत्वज्ञानी.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कँट



खेरीज ज्ञानाला प्रारंभच होणार नाही. तेव्हां मानवी ज्ञानाचे पहिले अग संवेदना होत; पण या संवेदना अवकाश व काल यांखेरीज शक्य नाहीत; म्हणून अवकाश व काल हीही ज्ञानाची अंगें होत. शिवाय ज्ञानाला एकत्व किंवा संबद्धत्व आणणाऱ्या कल्पना म्हणजे संख्या, गुण, संबंध व संभवनीयता या होत व या सर्वांच्या मूळाशी आत्म्याच्या जाणीवेची कल्पना. कोणतेही ज्ञान तुम्ही घ्या; त्यांत या सर्व अंगांचा अन्तर्भाव झालेला आहे असे आपल्यास दिसून येईल. एका दाखल्याने हे स्पष्ट करता येईल, समजा एखादा मनुष्य गाढ निद्रेतून जागा झाला तर प्रथमतः त्याच्या मनावर त्याच्या इंद्रियांकडून संवेदनांचा जणू काही मारा होईल, या सर्व संवेदनांचा त्याच्या मनांत घोटाळा माजलेला असेल. मला संवेदना होत आहेत येवढेच आधी त्याला कळेल. व बुद्धीच्या व्यापाराच्या योगे या सर्व विस्कळीत व म्हणूनच संदिग्ध संवेदनांचे बुद्धीने दिलेल्या स्वयंसिद्ध कल्पनांनुरूप वर्गीकरण होईल व त्या संवेदनांना स्पष्ट व सविकल्प ज्ञानाचे स्वरूप प्राप्त होईल. हे सर्व परिवर्तन मानवी मनाला न कळत अशा तऱ्हेने मनांत होत असते व मगच मानवी ज्ञान तयार होते. म्हणजे संवेदनारूपी ज्ञानाच्या कच्च्या मालावर बुद्धीचे व्यापार घडून ज्ञानरूपी पक्का माल तयार होतो असें उपमेने सांगतां येते.

 थोडक्यांत कँटची शानमीमांसा वरील तऱ्हेची आहे.त्याने संवेदनावादी व विवेकवादी ह्या दोघां तत्वज्ञांची ज्ञानमीमांसा कशी एकतर्फी व म्हणून चुकीची आहे हे आपल्या नव्या परीक्षणात्मक तत्वज्ञानांत दाखविलें आहे. कँटच्या मताप्रमाणे मानवी ज्ञानाला खालील गोष्टी अवश्यक आहेत.

 ६ संवेदना.

 २ अवकाश व काल.

 ३संख्या,परिमाण,भावरूपी व अभावरूपी गुण, कार्यकारणभाव, अन्योन्याश्रयभाव, पदार्थाचे अविनाशित्व व शक्याशक्यता वगैरे बारा स्वसंसिद्ध कल्पना.

 ४ सर्व ज्ञानाला एकसूत्रता आणणारी आत्म्याची जाणीव.

१०५