पान:तीन तत्वज्ञानी.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

तरी गणितशास्त्राचे विषय मुळी मानवी मनाने संवेदनांस दिलेले असल्या मुळे गणिताचे सिद्धांत सर्व पदार्थमात्राला लागू आहेत.

 याच्या पुढल्या प्रश्नाच्या उत्तराकरितां कँटने ज्ञानाचे जास्त पृथक्करण केले आहे. आपण ज्याला ज्ञान म्हणतो त्या विस्कळीत कल्पना नव्हेत. ज्ञान हे दोन कल्पनांच्या संयोगाने होते, म्हणजे ज्ञान हे विधानाच्या योगें होतें. आतां ह्यूमने म्हटल्याप्रमाणे संवेदना तर विस्कळीत व एकापासून एक दूर अशा असतात, न्यांत संबंध दिसून येत नाही. सर्व ज्ञान तर संबंधमय असते. तेव्हां ज्ञानांत हे संबंध कसे उत्पन्न होतात ? तर बुद्धि आपल्या काही स्वयंसिद्ध कल्पनांनी हे संबंध उत्पन्न करते व ज्या अर्थी विधाने बुद्धीने केली जातात त्या अर्थी तर्कशास्त्र ने केलेल्या विधानांच्या वर्गीकरणाकडे पाहिले म्हणजे ज्ञानामध्ये बुद्धीचा अंश किती हे तेव्हांच कळून येईल. कँटनें विधानाच्या वर्गीकरणावरून व पृथक्करणावरून खालील कल्पना ज्ञानामध्ये अन्तर्भूत होतात असे काढले आहे.

संख्यची कल्पना १ एकत्व, बहुत्व व एकूणत्व,
गुणाची कल्पना १ अस्तित्व, नास्तित्व व आस्तित्वनास्तित्व
संबंधाची कल्पना १ पदार्थाची शाश्वतता, २ कार्यकारणभाव ३ अन्योन्याश्रयभाव.
संभवनीयतेची कल्पना २ शक्यता व अशक्यता, २ प्रत्यक्षता, अप्रत्यक्षता ३ अवश्यकता व संभवनीयता..

 विस्कळीत संवेदनांना ज्ञानात्मक स्वरूप येण्यास या सर्व कल्पना अवश्यक आहेत. व या विशिष्ट कल्पनांशिवाय आणखी सर्व ज्ञानांत एक सामान्य कल्पना अन्तर्भत झालेली असते; ती कल्पना म्हणजे त्याची होय. सर्व संवेदनाचे एकीकरण व्हावयास या सर्व कल्पना मी अनुभवीत आहे अशी आत्म्याची जाणीव लागते. त्याखेरीज संबद्ध असें ज्ञानच शक्य नाही. तरी आतां पूर्वीच्या विवेचनाचा संग्रह करून मानवी ज्ञानाचे अवयव कोणते ठरतात ते पाहू या.

 ज्ञान होण्यास प्रथमतः संवेदना पाहिजेत हे उघड आहे. संवेदनां

१०४