पान:तीन तत्वज्ञानी.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

उपसिद्धांत विवेक काढतो. तेव्हां सर्व ज्ञान विवेकानें होते हे म्हणणे बरोबर नाही असें कैंटला वाटत असे. त्या वेळी हे गृहीत धरलेले सिद्धांत अनुभवाने कळतात असें त्याला वाटे, पण ह्यूमनें अनुभवाने सिद्धांत निघत नाहीत असे दाखविण्याचा प्रयत्न केला. याप्रमाणे सर्व ज्ञान संशवास्पद होऊ लागले. म्हणूनच कँटनें मानवी ज्ञान कसें होतें हाच प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाचे त्याने चार विभाग केले व आपल्या ग्रंथांच्या चार भागांत त्यांचे विवेचन केले. मानवी शानाचे स्थूल मानाने तीन शास्त्रांमध्ये वर्गीकरण करता येते. गणित, आधिभौतिक शास्त्रे किंवा सृष्टिशास्त्र आणि तत्वज्ञान, गणित व सृष्टिशास्त्रे ही अस्तित्वांत असून त्यांची सारखी प्रगति होत आहे ही निर्विवाद गोष्ट आहे असें कँटचे म्हणणे होते. तत्वज्ञानाच्या अस्तित्वाबद्दल मात्र शंका आहे. कारण त्यांत सर्वसंमत अशी प्रमेयेंच दृष्टीस पडत नाहीत. म्हणून विचार करावयाचे हे होत.

१ गणितशास्त्र का व कसे शक्य आहे ?
२ सृष्टि शास्त्र का व कसे शक्य आहे?
३ तत्त्वज्ञान शक्य आहे का ? व शक्य नसल्यास मानवी मनाची
तत्त्वज्ञानविषयक स्वाभाविक प्रवृत्ति का आहे?
४ कोणत्या पायावर नवीन तत्वज्ञान बनविता येईल.?

 कॅटच्या पहिल्या परीक्षणात्मक ग्रंथांत या चार प्रश्नांची चार भागांत उत्तरें आलेली आहेत. ही उत्तरे देतांना कॅटच्या मनापुढे विवेकवाद व संवेदनावाद हे एकांगीवाद सारखे आहेत व त्यांना उद्देशूनच जणू काही कँटने या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्याचा प्रथमतः ओढा संवेदनावादाकडे होता व म्हणून त्या वादाच्या म्हणण्यापासून सुरवात करून कॅटनें त्या वादाचा कमतरपणा दाखवून हळुहळू आपल्या परीक्षणात्मक तत्वज्ञानाकडे वाचकांना ओढीत नेलें आहे.

 सर्व मानवी ज्ञानाला संवेदनांपासून सुरवात होते हे खरे आहे. पण त्यावरून सर्व ज्ञान संवेदनात्मक आहे हे मात्र खरे नाही. संवेदना ही

१०२