पान:तीन तत्वज्ञानी.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३)
कँटचे तत्त्वज्ञान.


 पूर्वीच्या सर्व तत्वज्ञानापासून आपल्या तत्त्वज्ञानाचा फरक दाखविण्याकरतां कँटने आपल्या तत्वज्ञानाला परीक्षणात्मक तत्वज्ञान' असें नवीन नांव दिले आहे व ते त्याने तीन ग्रंथांत ग्रथित केले आहे. या ग्रंथांची नांवेंही दुर्बोध अशी आहेत. प्रथमतः त्याने 'शुद्ध विवेकाचे परीक्षण' या नांवाचा ग्रंथ लिहिला. हाच त्याच्या तत्वज्ञानाचा मुळ ग्रंथ होय. यामध्ये कॅटने आपली नवी ज्ञानमीमांसा इचे विवेचन केले. नंतर त्याने 'सदसद्विवेकाचे परीक्षण' म्हणून दुसरा ग्रंथ लिहिला. यांत त्याचे नीतिशास्त्रविषयक विचार आलेले आहेत. शेवटी त्याने 'भावनेचे परीक्षण, · नांवाचा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ कॅटच्या तत्वज्ञानरूपी कमानीचा जणू कांही मधला चिराच आहे. यामध्ये आपल्या पहिल्या दोन ग्रंथांतील विचारांचा मेळ घालून कँटने त्यावर नवीन विचारांचा मुगुटमणी चढविला आहे. हे तीन ग्रंय म्हणजे मानवी मनाच्या तीन प्रमुख शक्ति-विवेकशक्ति, इच्छाशक्ति व भावनाशक्ती-यांचे विवेचन आहे असे म्हटले तरी चालेल. आतां क्रमाने या तीन ग्रंथांचे थोडक्यांत सार सांगू या.

 कँटने कॉलेजांत असतांनाच वुल्फच्या विवेकवादी तत्वज्ञानाचा अभ्यास केला होता. या मताचे म्हणणे हे की, सर्व मानवी शान विवेकानें होते. पण त्याच वेळी विवेकशक्तीचा कमतरपणा कॅटच्या मनांत आला होता. विवेकशक्ति ही पृथक्करणात्मक शक्ति आहे; ती विधायक शक्ति नाहीं. विवेक विचारांचे पृथकरण करून त्यांतून अनुमानाने सिद्धांत काढील. परंतु विवेकानें नवीन न कधीही होणार नाही. विवेकाला प्रथमतः पूष्कळसे सिद्धांत गृहीत धरावे लागतात व त्या सिद्धांतांच्या साहाय्याने

१०१