पान:तीन तत्वज्ञानी.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कँट



बाक्लेंच्या तत्वज्ञानाची हकीकत आलीच आहे. तेव्हां त्याची येथे घुनरावृत्ति करण्याचे कारण नाही.

 ह्यूमने संवेदनावादाचा अंत संशयवादांत कसा होतो हे स्पष्ट करून दाखविले. त्याने प्रथमतः तीन पदार्थाबद्दल संशय प्रदर्शित केला. त्याचे म्हणणे हे की, बार्क्लेने दाखविलेल्या ज्या कारणाकरितां आपल्याला जड सृष्टीचे अस्तित्व मानतां येत नाही त्याच कारणाकरितां आत्मा व परमात्मा यांचेही अस्तित्व मानतां येत नाही. कारण संवेदनांच्या मागे काही तरी 'जड पदार्थ' आहे असे आपल्याला सांगता येत नाही, तर मनाच्या संवेदना, कल्पना, विचार, वासना व विकार-मनाचे सर्व व्यापार यांच्या मागें आत्मा आहे असें तरी कसे सांगतां येईल ? व जड सृष्टि व आत्मा हे पदार्थ संशयास्पद ठरल्यावर परमात्मा या पदार्थाच्या अस्तित्वाला तरी आधार काय ? तोही संशयास्पद ठरतो.

 याप्रमाणे ह्यूमने तत्त्वज्ञानाच्या पदार्थत्रयावर घाला घातला. पण तो येथेच थांबला नाही. आधिभौतिक शास्त्राचा पाया जी 'कार्यकारणाची कल्पना' त्या कल्पनेवर ह्यूमने घाव घालण्यास सुरवात केली. बेकन, लॉक किंवा बार्ले या संवेदनावादी तत्त्वज्ञान्यांनी कार्यकारणभावाची कल्पना गृहीतच धरली होती. लॉकच्या मते ती कल्पना आपल्या इतर शास्त्रीय कल्पनांप्रमाणे आपल्याला अनुभवाने--संवेदनांनी कळते. येथेच यूमने लॉकची घोडचूक दाखविली. झूमचे म्हणणे असे की, कार्यकारण भावाचा विचार ही कल्पनाशक्तीची भ्रांति आहे. ती संवेदनांनी समजणे शक्यच नाही. कारण, संवेदना एकामागून येतात, एवढेच संवेदना सांगू शकते; एक बिलियर्ड गोटी हालल्यानंतर दुसरी हलते, उष्णतेची संवेदना झाल्यावर भाजल्याची संवेदना होते. पण एक गोटी दुसऱ्या गोटीच्या गतीचे कारण हे काही आपण पहात नाही. तसेच उष्णता हे भाजल्याचे कारण हे कांही आपण पहात नाही. उष्णता व भाजणे ही पुष्कळ वेळां एका मागून एक आली म्हणजे आपल्याला त्यामध्ये जास्त निकट संबंध आहे असा नुसता भा होतो; परंतु संवेदनांमध्ये निकट

९९