पान:तीन तत्वज्ञानी.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कँट


पण या संदेहात्मक विधानांत एका पदार्थाबद्दल संदेह राहत नाही. तो पदार्थ म्हणजे अहंभावरूप आत्मा अगर मन. संदेह वाटण्याला सुद्धा 'संदेही' अस्तित्वांत पाहिजे. तेव्हां ' मी विचार करतो म्हणून मी अस्तित्वांत आहे ' हे मोठे प्रमेय या संदेहपद्धतींतून निघते. अहंभावाची जाणीव असलेल्या आत्म्याच्या अस्त्विाबद्दलचे पहिले सय आपल्याला निश्चितपणे कळतें. आतां या सत्यापासून आणखी सत्ये निष्पन्न होतात. आत्म्याच्या संदेहवृत्तीपासून आत्म्याचे अस्तित्व सिद्ध होते. पण संदेहवृत्ति-आत्मा म्हणजे अपूर्ण सदोष आत्मा होय. पण अपूर्ण व सदोष आत्मा ही कल्पना सापेक्ष आहे. ती कळण्याकरता 'संपूर्ण व दोषरहित आत्मा' ही कल्पना कळावीच लागते. पण ही दुसरी कल्पना म्हणजेच सर्वगुणसंपन्न परमेश्वराची कल्पना होय. तेव्हां जीवात्मा व परमात्मा अशा दोन कल्पना आपल्याला कळल्या. त्यांपैकी जीवात्म्याच्या अस्तित्वाची खात्री झालीच आहे. आतां परमात्म्याच्या अस्तित्वाची खात्री खालील प्रमाणाने पटते. सर्वगुणसंपन्न परमात्मा आस्तत्वात असलाच पाहिजे. कारण जर तो अस्तित्वांत नसेल तर तो सर्वगुणसंपन्न होणार नाही. कारण अस्तित्व हा गुण त्याच्यामध्ये नाही असे होईल. या विचारसरणीने सृष्टीतील दोन पदार्थ सिद्ध झाले. आतां राहिली बाह्य सृष्टि. हिचे अस्तित्वही सिद्ध करता येते. परमात्मा सर्वगुणसंपन्न आहे. या गुणांमध्ये 'सचोटी' हा गुण येतो. तेव्हां सर्वगुणसंपन्न परमेश्वर दुसऱ्यास फसविणार नाही. म्हणूनच आपल्या इंद्रियांना ज्या ज्या गोष्टी दिसतात त्या त्या सयमय असल्या पाहिजेत. नाही तर परमेश्वराने आपल्याला भ्रमविणारी इंद्रिये देऊन फसविले असे होईल. याप्रमाणे तत्त्वज्ञानाचे तीन पदार्थ सिद्ध झाले. जीवात्मा, परमात्मा व जड सृष्टि परमात्मा हा पूर्ण असून त्यानेच जीवात्मे व जड सृष्टि निर्माण केली. जीवात्मे व जड सष्टि यांचे गुण परस्परविरोधी आहेत. जीवात्मा विवेकवान् व अवकाशरहित पदार्थ आहे तर जड सृष्टि ही विवेकरहित व अवकाश व्यापणारी आहे. याप्रमाणे डेकार्टचे तत्त्वश्पन आहे. या तत्त्व.सा...७

९७