पान:तीन तत्वज्ञानी.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२)
कँटच्या पूर्वीचे तत्त्वज्ञान


 कॅट आपल्या इच्छेविरुद्ध नाइलाजाने तत्त्वज्ञानी बनला, असे म्हटले तरी चालेल. कॉलेजमध्ये त्याचे आवडते विषय म्हणजे गणित, ज्योतिषशास्त्र व इतर आधिभौतिक शास्त्रे. त्याने इंग्लंडांतला प्रसिद्ध गणिती व ज्योतिषी न्यूटन याच्या ग्रंथांचे आस्थेनें व काळजीपूर्वक अध्ययन केले होते; नव्हे त्याने आकाशांतील तारागणांसंबंधी एक ग्रंथ लिहून त्यांत सूर्यमालेच्या उत्पत्तीची न्यूटनच्या आकर्षणतत्त्वाच्या आधारे एक उपपत्ति बसविली होती. त्याचे काळी सर्व आधिभौतिक शास्त्रांची झपाट्याने वाढ होत होती व कँटने या सर्व शास्त्रांतील नवीन शोधांची माहिती करून घेतली होती. गणितशास्त्राचे सिद्धांत व आधिभौतिक शास्त्रांतील नियम हेच काय ते सत्यस्वरूप व खात्रीचे मानवी ज्ञान होय अशी कँटची समजूत होती. कारण हे सर्व ज्ञान अनुभवाच्या व संवेदनांच्या आधारावर उभारलेले असल्यामुळे त्याचा पाया भरभकम आहे असे कॅटला वाटे. कॉलेजांत असतांना कँटने जर्मन युनिव्हर्सिटीत शिकविले जाणाऱ्या तत्त्वज्ञानाचाही अभ्यास केला होता. प्रसिद्ध जर्मन तत्त्वज्ञानी लेबीनटझ याच्या तत्त्वज्ञानविषयक विचारांना व्यवस्थित पण संकुचित सूत्रमय असे स्वरूप वुल्फ या तत्त्वज्ञान्याने दिले होते; ते तत्त्वज्ञान कॅटच्या वेळी त्याचे युनिव्हर्सिटीत शिकविले जात असे व म्हणूनच युनिव्हर्सिटीत असतांना कॅटला तें शिकावे लागले होते. पण या तत्त्वज्ञानाबद्दल त्याला फारशी खात्री वाटत नसे. हे तत्त्वज्ञान कच्या पायावर उभारलेले आहे असें त्याला वाटे. सारांश, तरुण वयांत कॅटचा सर्व भर आधिभौतिक ज्ञानावर होता. मानवी ज्ञानांत जर कोणतें ज्ञान निश्चित,त्रिकालाबाधित व सर्वथा सत्यमय

९४