पान:तीन तत्वज्ञानी.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कँट


केल्याबद्दल कँटवर जर्मन सरकारचा रोष झाला. कँटने आपल्या वर्तनाने आपल्या मताचे समर्थन केले; परतु सरकारच्या मर्जीखातर महाराजांचा राजनिष्ठ प्रजाजन या नात्याने मी या पुढे या विषयावर लिहिणार नाही व बोलणार नाही, असे त्याने लिहून दिले, 'महाराजांचा राजनिष्ठ प्रजाजन' म्हणजे 'त्यावेळच्या राजाच्या हयातीपर्यंतचे आपले अस्तित्व' असा कँटने अर्थ मनांत धरला होता, व त्या राजाच्या मरणानतर त्याने धर्मविषयक एक ग्रंथ प्रसिद्ध केला. याप्रसंगी कँटच्या हातून चूक झाली, असे म्हणणे भाग आहे. या वेळी 'नरो वा कुंजरो वा' अशाच प्रकारचे कॅटचे वर्तन झाले, असे म्हणणे प्राप्त आहे. जो गृहस्थ आपल्या लेखणीत व लेखांत इतका विलक्षण धीट होता, तोच राजा पुढे भ्याला, असे याप्रसंगी वाटल्याखेरीज रहात नाही. परंतु ‘एको हि दोषो गुणसंन्नपाते निमज्जतीन्दोः किरणविवाकः' या न्यायाने कँटच्या एकंदर उदात्त चरित्रांत हा एक कमीपणा पार नाहीसा होतो. कँट इ. १८०४ मध्ये मृत्यु पावला.

९३