पान:तीन तत्वज्ञानी.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कँट


येथे त्याच्या विचारांचा एकंदर युरोपवर कसा परिणाम झाला, एवढे सांगणे अवश्य आहे; तथापि तें करण्यापूर्वी त्याच्या राहणींतील व त्याच्या विशेष संवयींतील एकदोन गोष्टी सांगून हा विषय संपवू.

 कँटला आपल्या नित्य ब्यवहारांत व नियमितपणांत व्यत्यय आलेला कधीच सहन होत नसे. एकदां कँट एका मोठ्या सरदाराच्या अत्याग्रहावरून त्याच्या गाडीतून बाहेर गेला; परंतु त्यामुळे त्याला त्या सरदाराच्या तब्बेतीप्रमाणे गाडीतून सावकाश व लांब वळसे घेऊन जावे लागले, व तेणेकरून त्याच्या ठरलेल्या कार्यक्रमांत बिघाड झाला. तेव्हांपासून कँटनें असा नियम केला, की, ज्या गाडीवर आपली पूर्णपणें हुकमत नाही, त्या गाडीत कधीही बसावयाचें नाहीं !

 कँट बारिकसारिक गोष्टीकडोहि लक्ष्य देत असे. त्याच्या खोलीतील व्यवस्थेत फरक झालेला त्याला चालत नसे. तसेंच, नोकराकडून बरोबर काम झालेच पाहिजे, अशी त्याची सक्ती असे. त्याचा नोकर लॅपी हा जरा शिथिल स्वभावाचा होता; परंतु तो कँटची तरतूद नीट राखीत असे. पुढे पुढे तो फारच अनियमित बनला व त्यामुळे कॅटला त्याला काढून टाकावे लागले.

 कॅटला शब्दांचे उच्चार व नांवाचे उच्चार कोणी चुकीचे केल्यास तें मुळीच खपत नसे. परंतु लँपी तर मृपिंडबुद्धि असल्यामुळे तो अशा चुका नेहमी करी, व कँट त्याला पढवीत असे. त्यामुळे कँटकडे येणाऱ्या पाहुण्यांस एक प्रकारचा फार्स नेहमी पहावयास सांपडे. कँटकडे हार्टगचें वर्तमानपत्र नेहमी येत असे; परंतु लॅपी या नांवाबद्दल नेहमी चूक करी. लँपी म्हणे " प्रोफेसरसाहेब हे हार्टमनचे वर्तमानपत्र घ्या." यावर कॅट म्हणे " काय ? तू काय म्हणतोस ? हार्टमनचे वर्तमानपत्र ? मी तुला सांगतों, हार्टमन नव्हे, हार्टग ! आतां माझ्याप्रमाणे म्हण पाहूं-हार्टमन नव्हे हार्टग" लॅपी एकाद्या फलटणीतील शिपायाप्रमाणे एकसारख्या स्वराने ते शब्द उच्चारी. त्याच्याकडून कँट असें त्रिवार म्हणून घेई, व ज्या ज्या वेळी तें वर्तमानपत्र ( आठवड्यांतून दोनदां) येई, त्या त्या

९१