पान:तिच्या डायरीची पाने.pdf/८३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मोकळेपणाने बोलेन. काही दिवसांपूर्वी मम्मी तिच्या वहिणीकडे मुद्दाम जाऊन आल्या आणि निमूचा पत्ताही घेऊन आल्या आहेत. मीही आता निर्मला माहेराला येण्याची वाट पाहात आहे.
 निर्मलेने भोगलेला कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, मानसिक ताण आणि त्रास आज एक कहाणी बनला आहे. आज निर्मला स्वतंत्रपणे, स्वावलंबी होऊन स्वतःचे जीवन जगत आहे हे जगणे अडचणी नसलेले आणि पूर्ण सुखी आहे असे मुळीच नाही. पण अडचणींवर मात करण्याची जिद्द वा धाडस आणि त्यांतून मार्ग शोधण्याचा डोळसपणा तिच्यात आला आहे. निर्मला दिलासाघरात राहात असताना सुरुवातीला तिला होणारा त्रास सासू आणि नणंदेच्या फुशीमुळेच कसा दिला जाई हे ती रंगवून सांगत असे. नवऱ्याला दोष देत नसे. जणू तो एक निर्जीव काठी आणि मारणाऱ्या त्या. पण संस्थेत आल्यापासून, हळूहळू तिच्यात बदल घडत गेला. दर बुधवारी दिलासातल्या महिला, कायदा सल्ला घेण्यासाठी व वेगवेगळी कौशल्ये शिकण्यासाठी येणाऱ्या महिला एकत्र बसत. गप्पा, गाणी, खेळ यांच्याबरोबर एखाद्या नव्याने आलेल्या प्रकरणाची वा वर्तमानपत्रातल्या स्त्री अत्याचाराच्या बातमीची चर्चा करीत. सती प्रकरणाची चर्चा तर दोन तीन वुधवारी सतत रंगली. दररोज सकाळ संध्याकाळच्या प्रार्थनेच्या वेळी बातम्या वाचून दाखवल्या जात. त्यावरही गप्पा होत. या साऱ्यातून निर्मला, कांता, हंसा सगळ्याच स्वतः विचार करायला नि ते बोलायला शिकल्या. धीटही झाल्या. एक दिवस मला नंगराध्यक्षांचा फोन आला-
 "भाभी तुमच्या दिलासाघरातील बाया भेटायला आल्या होत्या. त्यांना बालवाडीत सेविका म्हणून नोकरी पाहिजे. मी त्यांना म्हटलं की संस्थेत तुम्हाला जेवणखाण, कपडालत्ता मिळतो, राहायची सोय आहे. शिवाय त्या सांगत होत्या की बँकेत शंभर रुपयेही भरतात. मी म्हणालो की सेविकेला मिळतात अवघे दोनशे रुपये. तुमचे त्यात कसे भागणार? तर एकजण म्हणाली की आम्हाला तिथे राहायचे नाही. तुमच्या कानावर घालावे म्हणून फोन केला. काय अडचण आहे त्यांना तिथे राहाण्यात? तुम्ही म्हणाल तर करतो विचार." नगराध्यक्ष सांगत होते.

 या तिघी परस्पर जाऊन भेटल्या म्हणून मम्मी भयंकर चिडली. मोफत

७८
तिच्या डायरीची पाने